Asian Para Games 
क्रीडा

Asian Para Games : चीनमधील पॅरा गेम्समध्ये भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! खेळाडूंंनी ठोकलं पदकांचं शतक

Kiran Mahanavar

India Touches 100-Medal Tally in Asian Games : यावेळी 100 पार.... हे लक्ष्य घेऊन भारतीय खेळाडू चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई खेळ खेळण्यासाठी गेले होते. भारतीय खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत हे लक्ष्य पूर्ण केले आहे. सध्या 100 पदके जिंकली आहेत, मात्र ही संख्या आणखी वाढू शकते. एकूणच भारतीय खेळाडूंनी हांगझोऊमध्ये नवा इतिहास रचला आहे.यात 26 सुवर्ण, 29 रौप्य आणि 45 कांस्य पदकांचा समावेश आहे.

भारताच्या मुलींनी कबड्डीमध्ये सुवर्णपदक जिंकले, हे भारताचे 100 वे पदक होते. यावेळी भारताने जकार्ता आशियाई क्रीडा 2018 मध्ये 70 पदके जिंकण्याचा विक्रम मागे टाकला. 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण 70 पदके जिंकली होती. जकार्ता येथे भारताने 16 सुवर्ण, 23 रौप्य, 31 कांस्य अशी एकूण 70 पदके जिंकली होती.

1951 भारताची राजधानी दिल्ली येथे पहिल्या आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भारताने 15 सुवर्ण, 16 रौप्य आणि 20 कांस्य (एकूण 51 पदके) जिंकली होती. 15 सुवर्णपदके जिंकणे ही त्यावेळी अप्रतिम कामगिरी होती, आशियाई क्रीडा स्पर्धेत 15 सुवर्णपदके जिंकण्याचा भारताचा विक्रम दीर्घकाळ अबाधित राहिला होता. भारताने एकामागून एक अनेक आशियाई खेळ खेळले, परंतु 15 सुवर्ण जिंकण्याचा विक्रम कायम राहिला.

1982 मध्ये, जेव्हा भारताने पुन्हा एकदा आशियाई खेळांचे यजमानपद भूषवले, तेव्हा भारत हे सुवर्ण जिंकण्याच्या विक्रमाच्या अगदी जवळ आले. त्या वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 13 सुवर्ण,19 रौप्य आणि 25 कांस्य अशी एकूण 57 पदके जिंकली. पण तरीही भारतीय संघ 1951 मध्ये जिंकलेल्या 15 सुवर्णांच्या मागे राहिला.

त्यानंतर 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आणि 16 सुवर्णांसह एकूण 70 पदके जिंकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: संविधान नसतं तर..? राहुल गांधींनी फुले आंबेडकरांची आठवण काढत केली RSS वर टीका

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

SCROLL FOR NEXT