क्रीडा

Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय दिग्गज खेळाडूंची प्रतिष्ठा पणाला! शरथ, रोहन, बजरंग, श्रीजेशची पदकांसाठी झुंज

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - चीनमध्ये २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंचा कस लागणार आहे. टेनिसपटू रोहन बोपण्णा, हॉकीपटू पी. आर. श्रीजेश, टेबल टेनिसपटू शरथ कमल, कुस्तीपटू बजरंग पुनिया, स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल, टेनिसपटू अंकिता रैना, थाळीफेकपटू सीमा पुनिया या खेळाडूंची ही अखेरची आशियाई स्पर्धा असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पदकावर मोहोर उमटवण्यासाठी या सर्व खेळाडूंना प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.

रोहन बोपण्णाने या वर्षी विंबल्डनच्या उपांत्य फेरीत आणि अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. ४३ वर्षीय रोहनने रविवारी डेव्हिस करंडकातील अखेरचा सामना खेळला. भारताच्या विजयात त्याने मोलाची भूमिका बजावली. आशियाई स्पर्धेतील पुरुषांच्या दुहेरीत तो युकी भांब्रीच्या साथीने सहभागी होईल. २०१८ मधील आशियाई स्पर्धेमध्ये त्याने दिवीज शरणच्या साथीने सुवर्णपदक पटकावले होते. आता यंदा सुवर्णपदक राखण्यासाठी त्याला जिवाचे रान करावे लागणार आहे.

४१ वर्षीय टेबल टेनिसपटू शरथ कमल याने जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये दोन ब्राँझपदकाची कमाई केली होती. एवढेच नव्हे तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदके जिंकण्यातही त्याने यश मिळवले होते. राष्ट्रकुल व आशियाई या दोन्ही क्रीडा स्पर्धांमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. शरथसह जी. साथियन व हरमीत देसाई या भारतीयांचा पदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास सोपा नसणार आहे.

गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने भारतीय पुरुष हॉकी संघासाठी ३०१ लढती खेळल्या आहेत. मागील आशियाई स्पर्धेमध्ये भारताला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा पदकाचा रंग बदलण्यासाठी भारतीय हॉकी संघाला प्रयत्न करावे लागणार आहेत.

त्यासाठी श्रीजेशचा अनुभव मदतीला येऊ शकतो. भारतीय हॉकी संघाने तब्बल चार दशकानंतर ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याची किमया करून दाखवली होती. आता आशियाई स्पर्धेमध्येही सुवर्णपदक जिंकण्याची आशा बाळगता येणार आहे.

२९ वर्षीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याचीही आशियाई स्पर्धा ही अखेरची असणार आहे. २०१४ मधील आशियाई स्पर्धेमध्ये ६१ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्यानंतर २०१८ मधील आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची देदीप्यमान कामगिरी बजरंग पुनियाकडून करण्यात आली. आता आशियाई स्पर्धेमध्ये पदकाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी तो मॅटवर उतरेल यात शंका नाही.

महिलांची शिकस्त

भारताच्या काही महिला खेळाडूंसाठी आगामी आशियाई स्पर्धा अखेरची असणार आहे. यामध्ये दीपिका पल्लीकल, सीमा पुनिया व अंकिता रैना या खेळाडूंचा समावेश आहे. टेनिस खेळाडू अंकिता रैना हिने २०१८ च्या आशियाई स्पर्धेमधील महिला एकेरीत ब्राँझपदक पटकावले.

या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवातील टेनिस या खेळातील एकेरी विभागात पदक जिंकणारी ती भारताची सानिया मिर्झानंतरची दुसरी खेळाडू ठरली होती. यंदा अंकिता महिला दुहेरीत व मिश्र दुहेरीत सहभागी होणार आहे. स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट केली आहे.

यंदा ती मिश्र दुहेरीत सहभागी होणार आहे. जुळ्या मुलांची आई झालेल्या दीपिकाची ही अखेरची स्पर्धा असेल यात शंका नाही. त्यामुळे पदकासाठी ती सर्वस्व पणाला लावेल. थाळीफेकपटू सीमा पुनिया हिने मागील दोन्ही स्पर्धांमध्ये पदकावर हक्क सांगितला आहे. यंदा पदकाची हॅट्ट्रिक साजरी करण्यासाठी ती सज्ज झाली असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT