Athletics  sakal
क्रीडा

Asian Youth Athletics : उमरेडच्या संदीप गोंडला ऐतिहासिक ब्राँझपदक

भारतासाठी जिंकले पदक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे सुरू असलेल्या आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील संदीप गोंडने मुलांच्या ११० मीटर हर्डल्स शर्यतीत ब्राँझपदक जिंकून इतिहास घडविला. प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होताना संदीपने हे यश प्राप्त केले.

उडपी (कर्नाटक) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकून संदीपने आशियाई स्पर्धेची पात्रता गाठली होती. अतिशय आत्मविश्वासाने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संदीपने शर्यत १३.८० सेकंदात पूर्ण करून ब्राँझपदक आपल्या नावे केले.

या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वैयक्तिक पदक जिंकणारा तो विदर्भाचा एकूण पाचवा ॲथलिट ठरला. पाचपैकी मोनिका व रोहिणी राऊत यांनी क्रॉस कंट्री तर अपर्णा भोयर व राजीव बालकृष्णन यांनी ट्रॅकवरील स्पर्धेत पदक जिंकले आहे. नागपुरातील भारतीय कृषी विद्यालयाचा अकरावीचा विद्यार्थी असलेला संदीप पुण्यात खेलो इंडिया एक्सलन्स सेंटरमध्ये जय टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. प्राथमिक फेरीत त्याने १४.१२ सेकंदाची वेळ देत दुसरे स्थान मिळविले होते.

गेल्यावर्षी भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, त्याला आशियाई स्पर्धेची पात्रता गाठण्यात अपयश आले होते. यंदा त्याने ती भरपाई भरून काढली. १४ वर्षे वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने ८० मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. उमरेड येथे त्याच्या वडीलांचे छोटेसे दुकान असून त्याची सुरुवात उमरेड येथे ओम साई स्पोर्टिंग क्लबमध्ये प्रफुल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT