Assembly Election 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणा या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. आतापर्यंत आलेल्या निकालाच्या कलांवरून चार राज्यांपैकी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या राज्यात भाजपने चांगली आघाडी घेतली आहे. या राज्यात ते बहुमताच्या जवळ पोहचले आहेत.
भाजपच्या या दमदार कामगिरीनंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ट्वीट करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाना साधला. दानिश कनेरियाने पनौती कौन? असे दोनच शब्दात ट्विट करत हा चिमटा काढला आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वनडे वर्ल्डकप फायनलचा विषय देखील चर्चेत आला होता.
यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्येशून पनौती या शब्दाचा वापर केला होता. सोशल मीडियावर देखील पनौती हा ट्रेंड वर्ल्डकप फायनलनंतर सुरू झाला होता.
चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज सकाळपासूनच हाती येत आहेत. निकालाच्या सध्याच्या कलानुसार राजस्थानमध्ये भाजप 199 पैकी 112 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 70 जागांवर आघाडीवर आहे.
मध्य प्रदेशात भाजप 230 पैकी 163 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 64 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये मतमोजणी सुरू झाली त्यावेळी कांग्रेस स्पष्ट बहुमताचा आकडा पार करतोय असं दिसत होतं. मात्र नंतर भाजपने 53 जागांवर आघाडी घेतली. तर काँग्रेस 34 जागांवर आघाडीवर आहे.
काँग्रेसच्या दृष्टीकोणातून तेलंगणा हे एकमेव राज्य दिलासा देणारं राज्य ठरलं आहे. तेथे काँग्रेस 119 जागांपैकी 66 जागांवर काँग्रेस तर 39 जागांवर बीआरएस आघाडीवर आहे. भाजपने देखील 9 जागा मिळवत आपलं खातं उघडलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.