KL Rahul And Athiya Shetty Wedding Confirm Date 
क्रीडा

KL Rahul Wedding Date: अथिया नटली, मांडव सजला... न्यूझीलंड मालिकेवेळीच राहुलच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

Kiran Mahanavar

KL Rahul And Athiya Shetty Wedding Confirm Date: लोकेश राहुल याच महिन्यात अथिया शेट्टीसोबत लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे, जेव्हा क्रिकेटर राहुल आणि अथिया लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

राहुल सध्या श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे, ज्याचा शेवटचा सामना १५ जानेवारीला होणार आहे. यानंतर राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेऊ शकतो. कारण राहुललाही लग्नासंदर्भात अनेक गोष्टी फायनल करायच्या आहेत.

अथिया शेट्टीला तिच्या भावासोबत फॅशन डिझायनरच्या घरी देखील स्पॉट करण्यात आले होते, ज्यानंतर अथियाने तिच्या लग्नाचा ड्रेस फायनल केल्याची चर्चा आहे. लग्न कोणत्या दिवशी होणार त्याची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल आणि अथिया शेट्टी 23 जानेवारीला लग्न करणार आहेत, परंतु हा सोहळा 21 जानेवारीपासूनच सुरू होईल. लग्नापूर्वी 21 आणि 22 जानेवारीला हळदी, मेहंदी, संगीत समारंभ आदी कार्यक्रम होतील. लग्न कन्नड रितीरिवाजांनी होणार आहे. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा बंगल्यावर हे लग्न होणार आहे.

जवळच्या नातेवाईकांसह काही मोठी नावेही लग्नाला उपस्थित राहणार आहेत. राहुल हा क्रिकेटपटू आहे, तर अथिया बॉलीवूडची आहे, त्यामुळे क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील मोठी नावे लग्नाला उपस्थित राहणार आहेत. अक्षय कुमार, सलमान खान, गोविंदा, शिल्पा शेट्टी आदी बॉलीवूडमधील मोठ्या नावांचा समावेश असेल. त्यामुळे क्रिकेटविश्वातील सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली यांसारख्या दिग्गजांचा पाहुण्यांच्या यादीत समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT