Australia vs Pakistan Boxing Day Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात खुपच खराब झाली. पर्थच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 360 धावांनी पराभव केला.
आता ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे, जो बॉक्सिंग-डे कसोटी सामना देखील असेल. मेलबर्नमध्ये खेळला जाणारा पाकिस्तान विरुद्धच्या या मालिकेतील हा दुसरा कसोटी सामना आहे.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने 14 खेळाडूंऐवजी 13 खेळाडूंचा संघ निवडला आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात फक्त एक बदल केला आहे.
पहिल्या सामन्यासाठी बनवलेल्या संघातून त्याने फक्त एक वेगवान गोलंदाज लान्स मॉरिसला सोडले आहे. लान्स मॉरिस बीबीएल म्हणजेच बिग बॅश लीगमध्ये भाग घेणार आहे, त्यामुळे त्याला पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघातून वगळण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी लान्स मॉरिसच्या जागी इतर कोणत्याही खेळाडूचा संघात समावेश केलेला नाही. याचा अर्थ ऑस्ट्रेलियन संघ बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी केवळ 13 खेळाडूंचा संघ मैदानात उतरवेल, त्यापैकी 11 खेळाडू प्लेइंग इलेव्हनचा भाग असतील.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने बॉक्सिंग डे टेस्ट मॅचसाठी प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलताना सांगितले की, मला वाटत नाही की दुखापत ही समस्या असेल, त्यामुळे कदाचित आमची लाइनअप सारखीच असेल. पर्थमधील विजयानंतर सर्व गोलंदाज एकदम फ्रेश आहेत.
ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, स्टीव्ह स्मिथ, मिच स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.