क्रीडा

रिझवान, सलमान, जमालने डाव सावरला ; सिडनी येथील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानने पहिल्या डावात ३१३ धावा फटकावल्या.

पाकिस्तानची ९ बाद २२७ वरून ३१३ धावांपर्यंत मजल

सकाळ वृत्तसेवा

सिडनी : डेव्हिड वॉर्नरचा अखेरचा कसोटी सामना असलेल्या सिडनी येथील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानने पहिल्या डावात ३१३ धावा फटकावल्या. ५ बाद ९६ धावा अशा संकटात सापडलेल्या पाकिस्तानला मोहम्मद रिझवान (८८ धावा), आगा सलमान (५३ धावा) व आमेर जमाल (८२ धावा) यांच्या अर्धशतकांनी सावरले. त्यामुळे त्यांना पहिल्या डावात सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेरीस बिनबाद ६ धावा केल्या असून आता त्यांचा संघ ३०७ धावांनी पिछाडीवर आहे.

पर्थ व मेलबर्न येथील सामने गमावल्यामुळे पाकिस्तानवर कसोटी मालिका गमावण्याची आपत्ती ओढवली आहे. या कसोटीत नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मिचेल स्टार्क, जोश हॅझलवूड, पॅट कमिन्स व मिचेल मार्श या वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर पाकिस्तानच्या प्रमुख फलंदाजांची तारांबळ उडाली. मिचेल स्टार्कने अब्दुल्ला शफीकला (०), तर जोश हॅझलवूडने सईम अयूबला (०) झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सने बाबर आझम (२६ धावा) व सौद शकील (५ धावा) यांना बाद करीत मोठा अडसर दूर केला. मिचेल मार्शने कर्णधार शान मसूदला ३५ धावांवर बाद करीत पाकचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला.

अखेरच्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी

पाकिस्तानने नववा विकेट हसन अलीच्या रूपात २२७ धावांवर गमावला. त्यानंतर आमेर जमाल व मीर हामजा या जोडीने दहाव्या अर्थातच अखेरच्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी रचली. यामध्ये मीर हामजाचा वाटा होता फक्त सात धावांचा. जमाल याने ९७ चेंडूंमध्ये ९ नेत्रदीपक चौकार व चार खणखणीत षटकारांसह ८२ धावांची खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान पहिला डाव सर्व बाद ३१३ धावा (मोहम्मद रिझवान ८८, आगा सलमान ५३, आमेर जमाल ८२, पॅट कमिन्स ५/६१) वि. ऑस्ट्रेलिया बिनबाद ६ धावा (डेव्हिड वॉर्नर खेळत आहे ६, उस्मान ख्वाजा खेळत आहे ०)

दमदार अर्धशतके

पाकिस्तानचा संघ संकटात असताना मोहम्मद रिझवान व आगा सलमान जोडीने अधिक पडझड होऊ नये याची काळजी घेतली. रिझवान याने १० चौकार व २ षटकारांसह ८८ धावांची खेळी केली. पॅट कमिन्सच्याच गोलंदाजीवर तो बाद झाला. यानंतर कमिन्सने साजिद खानला १५ धावांवर बाद केले. ८ चौकारांसह ५३ धावा करणाऱ्या सलमानला मिचेल स्टार्कने बाद करीत पाकिस्तानची अवस्था ९ बाद २२७ धावा अशी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT