aus vs pak world cup controversy erupts as police restricts chants of pakistan zindabad at bengaluru stadium  
क्रीडा

Video Viral : चिन्नास्वामी स्टेडियमवर राडा! 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा, अन् चाहत्याची पोलिसाशी झाली बाचाबाची

Kiran Mahanavar

AUS vs PAK Viral Video : चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कांगारूंनी पाकिस्तानसमोर 368 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात 5 वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 62 धावांनी दणदणीत विजय मिळावला. पण या सामन्यादरम्यान त्यांच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर हेडलाईन बनवले.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान एक चाहता 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देत होता. एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला असे करण्यापासून रोखले आणि वाद सुरू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानी चाहते 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देत असताना पोलिसांनी तेथे येऊन चाहत्यांना घोषणा थांबवण्यास सांगितले. यावरून पाकिस्तानी चाहत्याला राग आला आणि त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या नारेबाजीवरून एक पाकिस्तानी चाहता पोलिसांशी वाद घालत असल्याचं व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे.

43 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानची जर्सी घातलेला एक चाहता पोलिस अधिकाऱ्याशी वाद घालताना म्हणाला की, 'मी पाकिस्तानचा आहे, त्यामुळे मी 'पाकिस्तान झिंदाबाद' बोलणार. जेव्हा लोक 'भारत माता की जय'च्या घोषणा देत आहेत, तेव्हा मी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा का देऊ शकत नाहीत, असा सवालही या चाहत्याने केला आहे.

पोलीस कर्मचाऱ्याच्या या कृतीचे भारतीय चाहते सोशल मीडियावर कौतुक करत आहेत, तर पाकिस्तानी चाहते त्यावर टीका करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT