Smith Shakes Record 30th Test Century sakal
क्रीडा

Steve Smith: सुवर्णसंधी हुकली! स्मिथने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम जवळपास मोडलाच होता...

Kiran Mahanavar

Smith Shakes Record 30th Test Century : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 30 शतके झळकावण्याचा विश्वविक्रम आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत स्मिथला हा विश्वविक्रम मोडण्याची संधी होती, मात्र तो तसे करू शकला नाही.

सर्वात वेगवान 30 कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत स्मिथने त्याचा सहकारी मॅथ्यू हेडन, रिकी पाँटिंग आणि माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 30 किंवा त्याहून अधिक शतके झळकावणारे केवळ 14 फलंदाज आहेत आणि स्टीव्ह स्मिथ आता त्यापैकी एक आहे.

स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 104 धावा केल्या आणि हे त्याचे 30 वे कसोटी शतक ठरले. स्मिथने 30 वे कसोटी शतक पूर्ण करण्यासाठी एकूण 162 डाव घेतले, तर सचिन तेंडुलकरने त्याच्या 159व्या कसोटी डावात ही कामगिरी केली. या विशेष यादीत स्मिथ आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या खालोखाल मॅथ्यू हेडन 167 डावांसह आणि त्यानंतर रिकी पाँटिंग 170 डावांसह आहे. पाचव्या क्रमांकावर सुनील गावसकर आहेत, ज्यांनी आपल्या 174व्या कसोटी डावात जादूई आकडा गाठला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सिडनी कसोटीचा दुसरा दिवस पावसामुळे पूर्ण झाला नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 131 षटकात 4 बाद 475 धावा केल्या आहेत. मॅट रेनशॉ पाच आणि उस्मान ख्वाजा 195 धावांवर खेळत आहे. स्मिथने 192 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT