Shane Warne: जगभरातील वेगवेगव्या गोलंदाजामध्ये शेन वॉर्नच्या नावाचा मोठा दबदबा होता. भलेही त्याची कारकीर्द वादग्रस्त राहिली असेल मात्र शेन वॉर्न (Shane Warne died) हा नेहमीच चर्चेत राहिला. त्यानं आपल्या कामगिरीनं जगभरातील अव्वल फिरकी गोलंदाज म्हणून (Australian Bowler) नाव कमावलं होतं. आपल्या फिरकीनं सामना एकहाती जिंकून देण्याचे सामर्थ्य हा गोलंदाजामध्ये होते. आजच्या घडीला जगातील सर्वाधिक फेम आणि लाईमलाईटमध्ये असणारा गोलंदाज म्हणून शेन वॉर्नला नेहमीच पसंती मिळाली होती. भारतीय क्रिकेटपटूंसोबत शेन व़ॉर्नचे सलोख्याचे संबंध होते.
आयपीएलमध्ये देखील शेन वॉर्नचा दबदबा होता. राजस्थान रॉयलचे कर्णधारपद त्यानं भुषवले होते. सचिन तेंडूलकर आणि शेन वॉर्नचे संबंध तर सगळ्यांना माहिती आहे. कमी वयात क्रिकेटमध्ये पदार्पण करुन आपल्या गोलंदाजीनं त्यावेळच्या जगातील सर्वोत्तम फलंदांजांना आपल्या गोलंदाजीनं धडकी भरवणारा शेन वॉर्न हा आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. 145 कसोटीचे सामने आणि 708 विकेटस् शेन वॉर्ननं घेतले होते. ऑस्ट्रेलियन संघाला नेहमीच आघाडीवर घेऊन जाण्यात शेन वॉर्नचा मोठा वाटा होता. त्यानं स्टीव्ह वॉ, मार्क वॉ, रिकी पॉटिंग यांच्या नेतृत्वाखाली मोठी कामगिरी केली होती. शेन वॉर्नच्या जाण्यानं ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. शेन वॉर्नच्या खिलाडूपणाची अनेक उदाहरणे दिली जातात. त्याच्या जाण्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. एक खेळाडू म्हणून शेन वॉर्न हा प्रसिद्ध होताच मात्र त्याच्या दिलखुलास स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. एक प्रेमळ सहकारी, दिलदार मित्र, मोकळ्या स्वभावाचा वॉर्न हा त्याच्या मित्रांमध्ये नेहमीच प्रसिद्ध होता. त्याच्या अनेक आठवणी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.