AUS vs PAK ESAKAL
क्रीडा

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानला व्हाईट वॉश; तिसऱ्या कसोटीत 8 विकेट्सनी दिली मात

अनिरुद्ध संकपाळ

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला तिसऱ्या कसोटीत 8 विकेट्सनी पराभूत करत तीन कसोटी सामन्यांची मालिका 3 - 0 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाला चौथ्या डावात विजयासाठी 130 धावांची गरज होती. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने 57 धावा आणि मार्नस लाबुशेनने नाबाद 62 धावांची खेळी केली.

पाकिस्तानने सिडनी कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सर्वबाद 313 धावा केल्या होत्या. यात मोहम्मद रिजवानच्या 88 धावांचे आणि आमेर अजमलच्या 82 धावांचे मोठे योगदान होते.

याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 299 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक 60 धावा केल्या. पहिल्या डावात 14 धावांची माफक आघाडी घेतलेल्या पाकिस्तानला दुसऱ्या डावात मात्र 115 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने 4 तर नॅथन लियॉनने 3 विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचं कंबरड मोडलं.

ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात विजयासाठी 130 धावा करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 2 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. आपली कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने कारकीर्दीचा शेवट अर्धशतक ठोकत गोड केला. त्याचबरोबर मार्नस लाबुशेनने नाबाद 62 धावा करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

(Sport Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati assembly news: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन घेणार दर्शन

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

'पाथेर पांचाली' मधील दुर्गा कालवश ; ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांच्या निधनाने बंगाली सिनेविश्वाला धक्का

SCROLL FOR NEXT