India Vs Australia 1st T20I Sean Abbott  esakal
क्रीडा

Sean Abbott : ऑस्ट्रेलियाच्या 'या' धडधडत्या तोफेपासून 'सावधान इंडिया'

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Australia 1st T20I Sean Abbott : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी 20 सामन्यांची मालिका मंगळवार ( दि. 20 सप्टेंबर) पासून सुरू होत आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप 2022 पूर्वी सरावाच्या दृष्टीकोणातून महत्वाची आहे. या मालिकेत भारत आपली वर्ल्डकपमध्ये खेळणारी प्लेईंग इलेव्हन खेळवण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यासाठी आपल्या काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. मात्र तरी देखील टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या एका वेगवान गोलंदाजापासून सावध राहण्याची गरज आहे.

ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडविरूद्ध वनडे मालिका खेळली. त्यात ऑस्ट्रेलियाच्या सीन एबॉटने भेदक मारा करत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने 5 षटकात फक्त 1 धावा दिली आणि दोन विकेट देखील घेतल्या. एबॉटने आपल्या 5 षटकांपैकी 4 षटके निर्धाव टाकलीत. त्याने आपल्या स्पेलमधील तब्बल 29 चेंडूवर फलंदाजाला एकही धाव घेऊ दिली नाही.

ऑस्ट्रेलियाने प्रमुख खेळाडूंना दिली विश्रांती

ऑस्ट्रेलियाने भारत दौऱ्यासाठी डेव्हिड वॉर्नरसह काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. यात मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि मिचेल मार्श यांचा समावेश आहे. या सर्वांना आपल्या छोट्या मोठ्या दुखापतीतून सावरण्यासाठी संघ व्यवस्थापनाने वेळ दिला आहे. दुसरीकडे या मालिकेत

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. वर्ल्डकपपूर्वी तो फॉर्ममध्ये येतो का हे पहावे लागले. सिंगापूरचा खेळाडू टीम डेव्हिडही आकर्षणाचा विषय असणार आहे. तो आता ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणार आहे.

भारताचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

ऑस्ट्रेलियाचा संघ :

सीन एबॉट, एश्टन एगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, अॅरोन फिंच (कर्णधार), कॅमरन ग्रीन, जॉश हेजलवूड, जॉश इंगलिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डेनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झाम्पा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT