AUS vs SA esakal
क्रीडा

AUS vs SA : भारत-ऑस्ट्रेलिया फायनल! चोकर्सचा डाग पुसण्यासाठी अफ्रिका शेवटपर्यंत लढली मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

Australia Defeat South Africa In World Cup 2023 Final : वर्ल्डकप 2023 च्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेचा 3 विकेट्स राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेचे 213 धावांचे आव्हान 7 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.

ऑस्ट्रेलियाला देखील हे 213 धावांचे माफक आव्हान पार करताना अडचणी आल्या. दमदार सुरूवातीनंतर कांगारूंची अवस्था 5 बाद 134 धावा अशी झाली होती. मात्र स्मिथ (30), जॉश इंग्लिस (28) अन् मिचेल स्टार्क (16) यांनी अफ्रिकेची कडवी झुंज मोडून काढत अंतिम सामन्याचं तिकिट फिक्स केलं.

वर्ल्डकप 2023 च्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या माफक 213 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 6 षटकात 60 धावा करत दमदार सुरूवात केली. त्यानंतर सलामीवीर ट्रॅविस हेडने 62 धावा करत संघाला 14 व्या षटकात संघाला शतकी मजल मारून दिली.

यानंतर मात्र अफ्रिकेच्या गोलंदाजांनी कांगारूंना धक्के देण्यास सुरूवात केली. डेव्हिड वॉर्नर 29 धावा करून बाद झाला. त्यानंतर मार्श शुन्यावर बाद झाला. स्मिथ आणि मार्नसने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र शम्सीने मार्नसला 18 धावांवर माघारी धाडले. पाठोपाठ मॅक्सवेलचाही त्रिफळा उडवत कांगारूंची अवस्था 5 बाद 137 धावा अशी केली.

त्यानंतर स्मिथने जॉश इंग्लिससोबत 37 धावांची भागीदारी रचत संघाला 174 धावांपर्यंत पोहचवले होते. मात्र कॉट्झीने स्मिथला 30 धावांवर बाद करत कांगारूंना मोठा धक्का दिला. त्यानंतर जॉश इंग्लिसने 28 धावा करत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र कॉट्झीने त्यालाही बाद करत ऑस्ट्रेलियाचे टेन्शन वाढवले.

जरी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 20 धावांची गरज असली तरी त्यांच्याकडे आता फक्त 3 फलंदाज शिल्लक होते. एका बाजूने स्टार्क सावध फलंदाजी करत होता. त्याला साथ देण्यासाठी कर्णधार पॅट कमिन्स आला होता. या दोघांनी आणखी पडझड न होऊ देता सामना 47.2 षटकात 213 धावांच आव्हान पार केल. स्टार्कने नाबाद 16 तर कमिन्सने नाबाद 14 धावा केल्या.

तत्पूर्वी, वर्ल्डकप 2023 च्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेची अवस्था 4 बाद 24 अशी केली होती. हा सामना ऑस्ट्रेलिया लिलया जिंकणार अन् अफ्रिका चोकर्सची चोकर्सच राहणार असे वाटत होते.

मात्र डेव्हिड मिलरने (116 चेंडूत 101 धावा) झुंजार शतक करत दक्षिण अफ्रिकेचे आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या शतकी खेळीत 5 षटकार आणि 8 चौकार मारले. त्याला 47 धावा करून हेन्री क्लासेनने चांगली साथ दिली. दक्षिण अफ्रिकेने 4 बाद 24 धावांवरून सर्वबाद 212 धावा केल्या.

मात्र डेव्हिड मिलर आणि हेन्री क्लासेनने पाचव्या विकेटसाठी महत्वपूर्ण 95 धावांची भागीदारी रचली अन् अफ्रिकेला शतकी मजल मारून दिली. दोघेही अर्धशतकाजवळ पोहचले होते. मात्र ट्रॅविस हेड या पार्ट टाईम गोलंदाजाने क्लासेनला 47 धावांवर बाद केले अने जोडी फोडली.

क्लासेनची साथ सुटल्यानंतर मिलरने एकट्याने किल्ला लढवला. त्याने जेराल्ड कॉट्झीला सोबत घेत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. दरम्यान, त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. मात्र जेराल्ड 19 धावा करून बाद झाला.

दुसऱ्या बाजूने मिलरने आपला झंजावात कामय राखत 115 चेंडूत शतक ठोकले. शतकाबरोबरच त्याने अफ्रिकेला 200 धावांच्या पार देखील पोहचवले. मात्र पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. अखेर अफ्रिकेचा डाव 212 धावात संपुष्टात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT