Australia vs Afghanistan Series esakal
क्रीडा

Cricket Series : ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानविरुद्ध ODI मालिका खेळण्यास दिला नकार; जाणून तुम्हालाही अभिमानचं वाटेल!

तालिबानच्या (Taliban) काही निर्णयांच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियन बोर्डानं हे मोठं पाऊल उचललं असून मालिका खेळण्यास नकार दिलाय.

सकाळ डिजिटल टीम

अफगाणिस्तानात सध्या तालिबानची राजवट आहे. त्यांनी आपल्या देशातील महिला आणि मुलींवर अनेक बंधनं लादली आहेत. त्यांना अभ्यासासह घराबाहेर काम करण्याचाही अधिकार नाहीये.

Australia vs Afghanistan Series : ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं (Australian Cricket Board) अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यास नकार दिलाय. ही मालिका मार्चच्या अखेरीस यूएईमध्ये (UAE) खेळवली जाणार होती.

मात्र, तालिबानच्या (Taliban) काही निर्णयांच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियन बोर्डानं हे मोठं पाऊल उचललं असून मालिका खेळण्यास नकार दिलाय. वास्तविक, ऑस्ट्रेलियन संघाला फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. यानंतर यूएईमध्ये पोहोचल्यानंतर अफगाणिस्तान संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही नियोजित होती, पण ऑस्ट्रेलियन संघ यापुढं ही मालिका खेळणार नाहीये.

अफगाणिस्तानात महिलांवर अनेक निर्बंध

अफगाणिस्तानात सध्या तालिबानची राजवट आहे. त्यांनी आपल्या देशातील महिला आणि मुलींवर अनेक बंधनं लादली आहेत. त्यांना अभ्यासासह घराबाहेर काम करण्याचाही अधिकार नाहीये. मुलींना खेळात सहभागी होण्यासही बंदी घालण्यात आलीये. तालिबानच्या या निर्णयाच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं क्रिकेट मालिका न खेळवण्याचा निर्णय घेतलाय.

ऑस्ट्रेलियन बोर्डानंही आपल्या निवेदनात याच गोष्टींचा उल्लेख केलाय. बोर्डानं जारी केलेल्या निवेदनात, 'अफगाणिस्तानसह जगभरातील महिला आणि पुरुषांना खेळात आणण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी सीए कटिबद्ध आहे. तसंच त्यांच्या देशातील महिला आणि मुलींची स्थिती सुधारण्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सतत संपर्कात आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात राबवला जाणार बिहार पॅटर्न ? जाणून घ्या कारणं

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Ayurveda Tips: 'या' दोन गोष्टी पाण्यात उकळून प्यायल्यास हृदयविकाराचा धोका होतो कमी

पुष्पा 2 चं बहुचर्चित Kissik आयटम सॉंग रिलीज ; श्रीलीलाच्या अदांसमोर समांथाही पडली फिकी

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत तासभर चर्चा

SCROLL FOR NEXT