Australia vs England 4th Ashes Test Match draw  Twitter
क्रीडा

AUS vs ENG: इंग्लंडच्या शेपटानं कांगारुंचा चौकार अडवला; मॅच ड्रॉ

सुशांत जाधव

Australia vs England 4th Ashes Test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सिडनीच्या मैदानात रंगलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी जवळपास 10 षटके खेळून दाखवत संघावर ओढावणारा सलग चौथा पराभव टाळण्यात यश मिळवले. सलामीवीर झॅक क्राउले (Zak Crawley) 77 धावा, बेन स्टोक्सनं (Ben Stokes) 123 चेंडूचा सामना करत केलेल्या 60 धावा आणि जॉनी बेयरस्टोनं (Jonny Bairstow) 105 चेंडूत 41 धावांची खेळी इंग्लंडला सामना वाचवण्यासाठी उपयुक्त ठरली. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉटनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स (Pat Cummins), नॅथन लायन (Nathan Lyon) यांनी प्रत्येकी 2-2 तर कॅमरुन ग्रीनला एक विकेट मिळाली.

ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर इंग्लंडला सलग तीन सामन्यात पराभूत करत 5 सामन्यांची मालिका आधीच खिशात घातली होती. मात्र मालिकेत चौका मारण्याचा त्यांचा मोका हुकला. अखेरच्या 10 षटकात ऑस्ट्रेलियन संघाला सामना जिंकण्यासाठी दोन विकेट्सची गरज होती. मुख्य गोलंदाजांना विकेट मिळत नसल्यामुळे पॅट कमिन्सन चेंडू स्मिथच्या हाती दिला. त्यानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत जॅक लीचला (Jack Leach) बादही केले. पण अनुभवी जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) यांनी दिवसाअखेरची मोजके चेंडू खेळून काढत सामना अनिर्णित राखला. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या संघाने 9 विकेट्सच्या मोबदल्यात 270 धावांपर्यंत मजल मारली.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. उस्मान ख्वाजाचं शतक (Usman Khawaja) आणि स्टीव्ह स्मिथ (Steven Smith) च्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 8 बाद 416 धावांचा डोंगर उभारुन डाव घोषीत केला. इंग्लंडचा पहिला डाव 294 धावांत आटोपला. जॉनी बेयरस्टोचं शतक आणि बेन स्टोकच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला इथपर्यंत मजल मारणं शक्य झालं. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजानं पुन्हा नाबाद शतकी खेळी केली. त्याच्या या शतकानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर 388 धावांच लक्ष्य़ ठेवलं होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT