Australian Cricket Team Coach Andrew McDonald  ESAKAL
क्रीडा

Australian Cricket Team Coach : सराव सामन्याची गरज नाही ; मॅकडॉनल्ड

आम्हाला भारताच्या आगामी कसोटी दौऱ्याआगोदर सराव सामन्याची गरज नाही

सकाळ वृत्तसेवा

मेलबर्न : ‘आम्हाला भारताच्या आगामी कसोटी दौऱ्याआगोदर सराव सामन्याची गरज नाही’, असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्रू मॅकडॉनल्ड यांनी व्यक्त केले आहे. मागील भारत दौऱ्यात आमचा पराभव झाला असला तरी आता आमचा संघ जास्त बलवान असून, आम्हाला नऊ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भारताच्या कसोटी दौऱ्यासाठी सराव सामन्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत सिडनीमधील वृत्तपत्रांशी संवाद साधताना मॅकडॉनल्ड म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलियाचा संघ जेव्हा परदेशात कसोटी मालिका खेळायला जातो तेव्हा आम्ही शक्यतो सराव सामने खेळायचे टाळतो. भारताच्या आगामी कसोटी दौऱ्याआगोदर सुद्धा आम्ही हेच धोरण पुढे नेणार आहोत. भारताविरुद्धची मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार असली तरी आम्ही काही दिवस आगोदर भारतात जाणार आहोत. आम्हाला भारतात १९ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकायची नामी संधी आहे. कधी कधी जास्त सराव केला तर खेळाडूंवरच जास्त दबाव येतो आणि मुख्य सामने खेळायच्या अगोदर ते दुखापतग्रस्त होतात. सराव सामना न खेळल्यानेच आम्ही पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत १-० असे पराभूत शकलो आहोत.’’

‘मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन हे दोन महत्त्वाचे खेळाडू जायबंदी झाले आहेत. ते आगामी भारत दौऱ्यामध्ये खेळावेत, असे माझे प्रामाणिक प्रयत्न असतील. मात्र त्यांच्यावर या कसोटी मालिकेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणताही दबाव नसेल’, असेही मत त्यांनी पुढे व्यक्त केले. या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघांनी आपले अंतिम खेळाडू अद्याप निवडलेले नाहीत.

पाच गोलंदाज हवेत ः टेलर

दरम्यान, भारत मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेशी सिडनी कसोटीत दोन हात करावयाचे आहेत. ही मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली असून अखेरच्या सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाच गोलंदाज मैदानात उतरावेत, असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू मार्क टेलर यांनी व्यक्त केले आहे. जेणेकरून भारत दौऱ्यातही याचा उपयोग होऊ शकेल असे त्यांना वाटते. कॅमेरुन ग्रीनला दुखापत झाल्यामुळे त्यांनी असे म्हटले.

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळापत्रक

पहिला कसोटी सामना

९ फेब्रुवारीपासून (नागपूर)

दुसरा कसोटी सामना

१७ फेब्रुवारीपासून (दिल्ली)

तिसरा कसोटी सामना

१ मार्च (धर्मशाला)

चौथा कसोटी सामना

९ मार्च ( अहमदाबाद)

136 words / 941 characters

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT