न्यूझीलंडच्या मैदानात रंगणाऱ्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी (ICC women's world cup 2022) आठ संघ सज्ज झाले आहेत. मुख्य सामन्यापूर्वी प्रत्येक संघाने सराव सामन्यातून न्यूझीलंडमधील खेळपट्टीचा अंदाज घेतला. 4 मार्च पासून रंगणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी सराव सामन्यादरम्यानचा एक गंमतीशीर किस्सा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
महिला वर्ल्ड कपच्या मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज महिला संघात सराव सामना झाला. यासामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरची (Australian cricketer) चांगलीच फजिती झाली. न्यूजीलंडमधील लिंकन ग्रीन मैदानातील सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर निकोला कॅरीसोबत एक घटना घडली. मैदानात उतरण्यापूर्वी ती वॉशरुममध्ये गेली आणि तिथेच अडकली.
जवळपास 20 मिनटे ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होती. पण बाहेरून लॉक झालेला दरवाजा उघडला नाही. कॅरीने स्वत: हा किस्सा शेअर केला आहे. बराच काळ वॉशरुममध्ये अडकले होते. स्टाफ सदस्यांच्या खटपटीनंतर यातून बाहेर पडल्याचे तिने सांगितले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भातील एक व्हिडिओही शेअर केलाय.
या व्हिडिओमध्ये निकोला म्हणतेय की, "मी आधी मैदानात आले . पण पुन्हा टॉयलेटमध्ये जावे लागले. वॉशरुमध्ये गेल्यानंतर आतून दरवाजा बंद केला. जेव्हा बाहेर येण्यासाठी दरवाजा उघडत होते तेव्हा दरवाजा उघडेना. ज्यावेळी कॅरी वॉशरुममध्ये अडकल्याची गोष्ट इतरांना समजली त्यावेळी तिच्या सहकाऱ्यांसह अनेकांना हसू अनावर झाले. याप्रकरणात क्रिकेट वर्ल्ड कपची प्रमुख एंड्रिया म्हणाल्या की, 'दरवाजा लॉक झाला होता. ही घटना लक्षात आल्यानंतर टीम मॅनेजरला बोलवले. मास्टर चावीच्या माध्यमातून अन्य काही लोकांच्या मदतीने दरवाजा उघडण्याची वेळ आली, असेही त्यांनी सांगितले.
27 फेब्रुवारीला रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने वेस्ट इंडीज संघाला 90 धावांनी पराभूत करत स्पर्धेतील प्रबळ दावेदार असल्याची झलक दाखवून दिली आहे. सराव सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना त्यांच्यासमोर 260 धावांचे लक्ष्य ठेवले. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज महिला संघ 169 धावांत आटोपला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.