Shane Warne dies suspected heart attack : ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटून शेन वॉर्न याचे ह्दयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. आपल्या फिरकीनं त्याने भल्या भल्या फलंदाजांना नाचवले होते. 4 जून 1993... हा दिवस शेन वॉर्नसाठी खास असाच होता. क्रिकेटच्या मैदानातील एका चेंडूनं भल्याभल्यांना चक्रावून सोडलं होत.
तो चेंडू टाकला होता शेन वॉर्ननं. त्याने टाकलेल्या चेंडू हा चमत्कारीक असाच होता. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात शेन वॉर्नने टाकलेला चेंडू बॉल ऑफ द सेंच्युरी (Shane Warne Ball of the Century) म्हणून ओळखला जातो. शेन वॉर्नने हा चेंडू जवळपास 90 अंशात वळवला होता. या चेंडूवर त्याने इंग्लंडचा दिग्गज फलंदाज माइक गेटिंग याची ऑफ स्टम्प उडवली होती.
शेन वॉर्न (Shane Warne Ball of the Century) याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 708 विकेट घेऊन आपली छाप सोडलीये. आपल्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळात त्याने जो चेंडू टाकला तो क्रिकेट जगतातील अशक्यप्राय वाटणारी गोष्टच होती. 1993 मध्ये शेन वॉर्नने केवळ 11 कसोटीत संघाचे प्रतिनिधीत्व केले होते 1992 मध्ये बॉक्सिंग डे कसोटीत वेस्ट इंडीज विरुद्ध 52 धावा खर्च करुन 7 विकेट घेणाऱ्या शेन वॉर्नला अॅशेस मालिकेत संधी मिळाली. 3 जून 1993 ला या स्पर्धेला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना 289 धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरुवात केली. सलामी जोडीनं 71 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर माइक गॅटिंग मैदानात उतरले. त्यांनी खणखणीत चौकार खेचून खाते उघडले.
बॉल ऑफ द सेंचुरी
गेटिंग आणि ग्राहम गूच जोडी फोडण्यासाठी तत्कालीन ऑस्ट्रेलियन कर्णधार एलेन बॉर्डरने शेन वॉर्नच्या हाती चेंडू सोपवला. यावेळी शेन वॉर्ननं चमत्कारच दाखवून दिला. वॉर्नने पहिल्याच चेंडूवर माइक गेटिंग यांची ऑफ स्टम्प उडवली. शेन वॉर्नचा हा चेंडू कमालीचा होता. (Shane Warne Ball of the Century) शेन वॉर्नन टाकलेला चेंडू माइक गेटिंग यांच्या लेग स्टंपवर पडला. त्यांनी तो बचावात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅट जवळून जात ऑफ स्टम्पवर आदळला. हा चेंडू पाहणाऱ्या प्रत्येकजण आश्चर्यचकीत झाला. या चेंडूला शतकातील सर्वोत्तम चेंडू म्हणून सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.