मेलबर्न: ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय बिग बॅश लीग 2021-22 (Big Bash League 2021-22) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मेलबर्नच्या डॉकलँड स्टेडियमवर मेलबर्न रेनेगेड्स (Melbourne Renegades) आणि एडिलेड स्ट्रायकर्स (Adelaide Strikers) यांच्यात रंगलेल्या तिसऱ्या सामन्यात 19 वर्षीय युवा अष्टपैलून आपल्यातील क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवून दिला. मेलबर्न रेनेगेड्सच्या जॅक फ्रेजर-मॅक्गर्क (Jake Fraser-McGurk) ने सीमारेषेवर सुपर मॅनसारखी हवेत झेप घेत भन्नाट झेल टिपला.
झाकिर खान मेलबर्न रेनेगेड्सकडून सातवे षटक घेऊन आला होता. त्याच्या फुल लेंथ चेंडूवर जॅक वेदरल्डने जबरदस्त टायमिंगसह उत्तुंग फटका मारला. हा चेंडू सीमारेषेबाहेर जाईल आणि फलंदाजाला सहज सहा धावा मिळतील असे वाटत होते. पण जॅक फ्रेजर-मॅक्गर्कने सुरेख झेल पकडत त्याचे रुपांतर विकेटमध्ये केले. त्याने एका हातात घेतलेल्या कॅचची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. कॅच घेतल्यानंतर त्याने ज्या पद्धतीने आनंद व्यक्त केला तेही क्रिकेट चाहत्यांना चांगलेच भावले आहे.
जॅकने पकडलेला झेल हा सामन्याला कलाटणी देणारा ठरला. मेलबर्नचा संघाने हा सामना अवघ्या 2 धावांनी गमावला. जर हा कॅच सुटला असता तर सामन्याचा निकाल काही वेगळाच असता. मेलबर्न रेनेगेड्स या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. निर्धारित 20 षटकात त्यांनी 9 बाद 153 धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना एडिलेड स्ट्रायकर्स संघाला निर्धारित 20 षटकात 151 धावांपर्यंत मजल मारता आली. मेलबर्नकडून खेळणाऱ्या झाकीर खानने सर्वाधिक तीन विकेटसह मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकवला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.