Avesh Khan Team India Call Up esakal
क्रीडा

Avesh Khan : RCB विरूद्धच्या राड्यावर आवेश खान म्हणाला; हेलमेट प्रकरण जरा..

अनिरुद्ध संकपाळ

Avesh Khan Team India Call Up : आयपीएल 2023 च्या हंगामात रॉयल चॅलेंजल बेंगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर भिडले होते. मात्र यापूर्वी अनेक गोष्टी या दोन संघादरम्यान झाल्या होत्या. लखनौने पहिल्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर आवेश खानने हेलमेट फेकत आपला आनंद व्यक्त केला होता. यासाठी तो चांगलाच ट्रोल झाला होता. आता याबाबत आवेश खानने प्रतिक्रिया दिली आहे.

आवेश खान म्हणाला की, 'सोशल मीडियावर माझ्याबद्दल वातावरण तयार झाले. हेलमेटचं प्रकरण जरा जास्तच झालं. मला नंतर जाणीव झाली की मी असं करायला नको होतं. ते भावनेच्या भरात होऊन गेलं. मला आता दुःख होत आहे. अशी गोष्ट करायला नको होतो.'

भारतीय संघ पुढच्या महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात आवेश खानला त्याचा समावेश होईल अशी आशा आहे. आवेश खानने भारताकडून शेवटचा सामना ऑक्टोबर 2022 मध्ये खेळला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता.

आवेश खान भारतीय संघात पुन्हा निवड होण्याबाबत म्हणाला, 'मी वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाण्याची अपेक्षा करत आहे. एक खेळाडू म्हणून माझी निवड ही माझ्या हातात नाही. तुम्हाला चढ - उतार पहावे लागतात. माझी पुनरागमन करण्याची इच्छा आहे.'

आवेश खानने रणजी ट्रॉफीत चांगली कामगिरी केली आहे. टी 20 गोलंदाज असा शिक्का पुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या आवेश खानने यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत 8 सामन्यात 38 विकेट्स घेतल्या आहेत. मध्य प्रदेश सेमी फायनलमध्ये पराभूत झाली होती. लाल चेंडूवर आवेश खानने प्रभावी गोलंदाजी करत आपली कसोटी संघातील दावेदारी सादर केली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT