Babar Azam esakal
क्रीडा

Babar Azam : मी तर सहन केलं नसतं आफ्रिदी भाई... बाबरचा 'तो' Video ठरतोय चर्चेचा विषय

Babar Azam Dropped Catch : बाबरनं सोपा झेल सोडला अन् ट्विटवर कमेंटचा पाऊस

अनिरुद्ध संकपाळ

Babar Azam Dropped Catch : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात यजमान किवींनी पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. न्यूझीलंडने 20 षटकात 8 बाद 226 धावा ठोकल्या. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेल (61) आणि कमबॅक करणाऱ्या केन विलियम्सनने (57) अर्धशतकी खेळी केली.

दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने केन विलियम्सनचा एक सोपा झेल सोडून कर्णधार शाहीन आफ्रिदीची डोकेदुखी अजूनच वाढवली. कारण ज्यावेळी बाबर आझमने केनचा झेल सोडला त्यावेळी त्याने फक्त 2 धावा केल्या होत्या.

बाबर आझमने सोपा झेल सोडल्यानंतर त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक क्रिकेट चाहते बाबर आझमची खिल्ली उडवत आहेत. जेव्हापासून बाबर आझमचे कर्णधारपद गेलं आहे त्याच्या कामगिरीत ड्रॉप आला आहे.

न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात अब्बास आफ्रिदीच्या गोलंदाजीवर केन विलियम्सनने एक फटका हवेत खेळला. हा हवेत गेलेला चेंडू पकडण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने केला. मात्र त्याला सोपा झेल पकडता आला नाही. सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात डेवॉन कॉन्वेला बाद करत मोठा धक्का दिला. मात्र त्यानंतर केन विलियम्सन आणि एलन फिन यांनी 49 धावांची भागीदारी रचली.

फिन बाद झाल्यानंतर विलियम्सन आणि डॅरेल मिचेल यांनी 79 धावांची भागीदारी रचली. विलियम्सनने 57 धावांची खेळी केली तर मिचेलने 27 चेंडूत 61 धावा चोपल्या. यानंतर कॅम्पनने 26 तर ग्लेन फिलिप्सने 19 धावांचे योगदान दिलं. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 46 धावात 3 तर अब्बास आफ्रिदीने 34 धावात 3 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT