ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (Pakistan vs Australia) यांच्यातील दुसऱ्या कसोटीत कांगारूंनी विजयासाठी ठेवलेल्या 506 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने पाचव्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात 300 चा टप्पा पार केला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) चौथ्या दिवशीच शतक झळकावून आपण सामना सोडला नसल्याचे दाखवून दिले होते. त्याने पाचव्या दिवशी देखील चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला फक्त झुंजवले नाही तर हळूहळू विजयाच्या दिशेने कूच देखील करणे सुरू केले आहे.
कराची कसोटीत (Karachi Test) आस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत पहिला डाव 556 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) 160 धावांची दमदार दीडशतकी खेळी केली. त्याला अॅलेक्स केरीने 93 तर स्टीव्ह स्मिथने 74 धावांची खेळी केली. पाकिस्तानची पहिल्या डावात फलंदाजी चांगली झाली नाही. त्यांचा पूर्ण संग 148 धावातच माघारी गेला. पहिल्या डावात बाबर आझमने सर्वाधिक 36 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 3 तर स्वेपसनने 2 विकेट घेतल्या.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 408 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करत 2 बाद 97 धावा केल्या. 97 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावात दीडशतक ठोकणाऱ्या उस्मान ख्वाजाने दुसऱ्या डावातही नाबाद 44 धावा केल्या. त्याला लॅम्बुश्गनेने देखील 44 धावा करून चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 97 धावांची भर घालून पाकिस्तान समोर विजयासाठी 506 धावांचे आव्हान ठेवले.
विजयासाठीच्या एवढ्या मोठ्या धावसंख्येसमोर पाकिस्तानचा संघ नांगी टाकले असे वाटत होते. मात्र पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर अब्दुल्लाह शफीक यांनी चौथ्या दिवशी प्रतिकार केला. पहिल्या दोन विकेट स्वस्तात माघारी गेल्यानंतर बाबर आझमने शतक तर शफीकने अर्धशतक ठोकून चौथा दिवस खेळून काढला. पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा हा झुंजारपणा मोडून काढेल अशी आशा होती.
मात्र बाबर आझमने चिवट फलंदाजी केली. त्याच्या नाबाद दीडशतकी खेळीमुळे सामन्याच्या अखेरच्या दिवशी पाकिस्तानने चहापानापर्यंत 4 बाद 310 धावांपर्यंत मजल मारली. आता पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या सत्रात 196 धावांची गरज आहे. तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी पाकिस्तानच्या 6 विकेट घेणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्यासमोर बाबर आझमने कडवे आव्हान उभे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.