Babar Azam Finish 25 Month Century Drought Ravichandran Ashwin Tweet  ESAKAL
क्रीडा

PAK vs AUS: बाबरचे 25 महिन्यानंतर शतक त्यावर अश्विनचे ट्विट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) झुंजार फलंदाजीचे दर्शन घडवले. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 506 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर 2 बाद 192 धावांपर्यंत मजल मारली. बाबर आझमच्या या शतकी खेळीचे रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) देखील कौतुक केले. कसोटीच्या पाचव्या दिवशी पाकिस्तानला विजयासाठी 314 धावांची गरज असून बाबर आझम (नाबाद 102) आणि नाबाद 71 धावा करणारा अब्दुल्लाह शफीक पाचव्या दिवशी पाकिस्तानचा किल्ला लढवणार आहेत.

बाबर आझमने 25 महिने सुरू असलेला आपल्या शतकांचा दुष्काळ संपवला. बाबर आझमने कसोट कारकिर्दितील 6 वे तर पाकिस्तानातील तिसरे शतक ठोकले. बाबर आझम आणि सलामीवीर अब्दुल्लाह शफीक यांनी 2 बाद 21 धावा अशा बिकट परिस्थितीतून डाव सावरला. या दोघांनी चौथ्या दिवशी तिसऱ्या विकेटसाठी 171 धावांची नाबाद भागीदारी रचली. त्यामुळे 506 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला कांगारूंसमोर चांगली फाईट उभा करता आली. पाकिस्तानला आता चौथ्या दिवशी विजयासाठी 314 धावांची गरज आहे तर ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानच्या 8 विकेट घ्यायच्या आहेत.

बाबर आझमच्या या झुंजार खेळीचे कौतुक भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ट्विट करून केले. अश्विनने टाळ्या वाजवणारे इमोजी शेअर करत लिहिले की 'बाबर आझम मस्त फलंदाजी. अखेरच्या दिवशी हा सामना रोमांचकारी स्थितीत पोहचेल.' दरम्यान बाबरने आपला शतकांचा दुष्काळ संपवला मात्र भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) शतकांचा दुष्काळ काही संपण्याचे नाव घेत नाहीये. (Ashwin Tweet on Babar Azam Century)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT