दुबई : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) २०२१ चा आयसीसी पुरूष एकदिवसीय क्रिकेटर (ICC Mens ODI Cricketer of 2021) पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे बाबर आझमने २०२१ मध्ये फक्त ६ एदिवसीय सामने खेळले होते. पण, पाकिस्तानकडून (Pakistan) खेळलेल्या दोन मालिकांमध्ये त्याचे मोलाचे योगदान होते. (Babar Azam played only 6 ODI IN 2021 Still Get ICC ODI Cricketer of 2021 award)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) मालिकेत पाकिस्तानने २ - १ असा विजय मिळवला होता. त्यात बाबर आझमने मालिकेत २२८ धावा केल्या होत्या. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने २७४ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यात बाबर आझमने शतक झळकावले होते. त्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ८२ चेंडूत ९४ धावांची खेळी केली. त्यावेळी देखील पाकिस्तानने आफ्रिकेने ठेवलेल्या ३२० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यातील मालिकेत देखील बाबर आझमने (Babar Azam) एकाकी झुंज दिली होती. मात्र इंग्लंडने पाकिस्तानचा ३ - ० असा पराभव केला होता. या मालिकेत बाबर आझमने तीन सामन्यात १७७ धावा केल्या होत्या. दुसऱ्या बाजूने मालिकेत इतर कोणत्याही पाकिस्तानी फलंदाजाला १०० धावा देखील करता आल्या नव्हत्या. पाकिस्तानने इंग्लंड विरूद्धच्या अखेरच्या सामन्यात ३३१ धावा केल्या होत्या. त्यात बाबर आझमने एकट्याने निम्म्यापेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.