Babar Azam Reaction Over Pakistan PM Shehbaz Sharif Tweet : रविवारी होत असलेल्या इंग्लंड - पाकिस्तान टी 20 वर्ल्डकप फायनल सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी बाबर आझमला भारताचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खोडसाळपणाने केलेल्या ट्विटबाबत प्रश्न विचारण्यात आला. शाहबाज शरीफ यांनी इंग्लंडने सेमी फायनलमध्ये भारताचा 10 विकेट्सनी पराभव केल्यानंतर 'तर रविवारी आता 152/0 Vs 170/0 #T20WorldCup' असे ट्विट केले होते.
पाकिस्तानने गेल्या वर्षी झालेल्या टी 20 वर्ल्डकप 2021 मध्ये भारताचे 152 धावांचे आव्हान बिनबाद पार केले होते. यंदाच्या टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये इंग्लंडने सेमी फायनल सामन्यात भारताचे 169 धावांचे आव्हान 16 षटकात बिनबाद पार करत अंतिम फेरी गाठली होती. यावरूनच भारताला चिमटा काढण्यासाठी शाहबाज शरीफ यांनी हे खोडसाळ ट्विट केले.
दरम्यान, शनिवारच्या पत्रकार परिषदेत बाबर आझमला अशा सोशल मीडिया पोस्टमुळे तुमच्यावर अधिकचा दबाव येतो का असे विचारण्यात आले. त्यावेळी त्याने 'अशा प्रकारचा कोणता दबाव नसतो. मात्र माफ करा मी हे ट्विट पाहिलेले नाही. त्यामुळे मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र आम्ही आमच्या प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध आमचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो.' अशी प्रतिक्रिया दिली. बाबर आझमने एकप्रकारे पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या खोडसाळपणाला जास्त हवा न देण्याचा पवित्रा घेतला.
याचबरोबर बाबर आझमला 1992 चा वर्ल्डकप आणि यंदाचा टी 20 वर्ल्डकप यांच्यातील योगायोगाबाबद देखील प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्याने 'नक्कीच योगायोगाच्या काही गोष्टी आहेत. आम्ही वर्ल्डकप जिंकण्याचा प्रयत्न करू. या संघाचे इतक्या मोठ्या स्टेजवर नेतृत्व करायला मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. आम्ही विजयासाठी शंभर टक्के प्रयत्न करू. आम्ही स्पर्धेची सुरूवात चांगली केली नव्हती. मात्र संघाने जोरदार पुनरागमन केले. ते वाघासारखे लढले आहेत. आम्ही आता अंतिम सामन्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.