Babar Azam Surpasses Virat Kohli In T20 batting rankings Remain Top spot longest period esakal
क्रीडा

ICC T20I Ranking : पाकच्या बाबर आझमने विराट कोहलीला टाकले मागे

अनिरुद्ध संकपाळ

दुबई : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) भारताचा रन मशिन विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकत आयसीसी टी 20 बॅटिंग रँकिंगमध्ये सर्वाधिक काळ अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. नुकत्याच जाहीर झालेल्या ICC T20 batting rankings मध्ये आपले अव्वल स्थान अबाधित राखले आहे.

विराट कोहली आयसीसी टी 20 बॅटिंग रँकिंगमध्ये तब्बल 1 हजार 13 दिवस अव्वल स्थानावर होता. मात्र आता हे रेकॉर्ड पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडले आहे. याचबरोबर इशान किशनची रँकिंगमध्ये दोन स्थानाची घसरण झाली आहे. तर दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांनी मोठी उसळी घेतली आहे. या दोघांनीही आयर्लंडविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. सॅमसनने 77 तर हुड्डाने 104 धावांची शतकी खेळी केली होती.

इशान किशनने आयर्लंड विरूद्धच्या दोन टी 20 सामन्यात 26 आणि 3 धावा केल्याने तो क्रमवारीत सातव्या स्थानावर घसला आहे. तर शतकी खेळी करणारा दीपक हुड्डाने पहिल्या सामन्यातही 47 धावांची खेळी केली होती. त्याने 414 व्या स्थानावरून 104 स्थानापर्यंत उसळी घेतली आहे. तर ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याने दुसऱ्या सामन्यात संधी मिळालेल्या संजू सॅमसनने संधीचे सोने करत 77 धावांची खेळी केली होती. तो आता आयसीसी टी 20 बॅटिंग रँकिंगमध्ये 144 व्या स्थानावर पोहचला आहे.

आयर्लंडचा आक्रमक फलंदाज हॅरी टेक्टरने देखील भारताविरूद्धच्या टी 20 मालिकेत चांगली कामगिरी केल्यामुळे रँकिंगमध्ये 55 स्थांनांची उसळी घेतली. तो आता आयसीसी टी 20 बँटिंग रँकिंगमध्ये 66 व्या स्थानावर पोहचला आहे. त्याने पहिल्या सामन्यात 39 आणि दुसऱ्या सामन्यात 64 धावांची खेळी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT