Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 sakal initiative on sunday 10 december running health fitness  Sakal
क्रीडा

Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : दिग्गज धावपटूंच्या सहभागामुळे रंगत

रविवारी होणाऱ्या पुणे हाफ मॅरेथॉनची उत्सुकता शिगेला

सकाळ वृत्तसेवा

Pune Half Marathon 2023: प्रत्येक वर्षागणिक भारतातील आघाडीच्या धावपटूंचे आकर्षण ठरू लागलेली सकाळतर्फे आयोजित बजाज अलियान्स पुणे अर्ध मॅरेथॉन यंदाही पुरुष व महिला गटातील दिग्गज धावपटूंच्या सहभागामुळे रंगतदार होणार आहे.

विशेष म्हणजे पुढील वर्षी पॅरिस ऑलिपिकची पात्रता गाठण्याची तयारी करीत असलेला ३२ वर्षीय एबी बेलीअप्पा सकाळच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेने आपल्या पॅरिसच्या तयारीचा श्रीगणेशा करणार आहे. गतविजेत्या रेश्मा केवटेच्या सहभागामुळे महिला गटात आणखी चुरस निर्माण झाली आहे.

मुळ कर्नाटकातील असलेला व सध्या पुणे येथेच आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्युटमध्ये सराव करणारा बेलीअप्पा म्हणाला, सध्या पॅरिस ऑलिंपिकच्या दृष्टीने माझी तयारी सुरू आहे. त्यामुळे तयारी कशी सुरू आहे, हे तपासण्याच्या उद्देशाने मी शर्यतीत उतरलो आहे. निर्धारीत केलेले प्लॅन योग्य दिशेने जात आहे की नाही, हे या शर्यतीतून मला व प्रशिक्षकाला दिसून येईल.

यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १२ वा क्रमांक मिळविलेला बेलीअप्पा कधीकाळी नियमीतपणे क्रॉस कंट्री करायचा. सध्या त्याने पूर्ण मॅरेथॉनवर लक्ष केंद्रीत केले असून यंदा फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे नोंदविलेली २ तास १४ मिनीटे १५ सेकंद ही त्याची सर्वोत्तम वेळ आहे.

तसेच ढाका येथे झालेल्या सॅफ नेशन मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलेले ब्राँझपदक त्याच्या नावावर आहे. बेलीअप्पा प्रबळ दावेदार असला तरी त्याच्यापुढे सेनादलातील त्याचा सहकारी कार्तिक कुमार, सातारच्या आंतरराष्ट्रीय धावपटू कालिदास हिरवे,

अजय कुमार, सेनादलाचा हरजोधवीर सिंग, महाराष्ट्राचा किरण मेत्रे, बाळू पुकाले, सुनील कुमार, अनुराग कोणकर, बबलू चव्हाण व आसिफ खान यांचे कडवे आव्हान असेल.

कार्तिक कमाल करणार

बेलाअप्पा दावेदार मानला जात असला तरी यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकणारा २४ वर्षीय कार्तिक कुमार कमाल करू शकतो. कारण पाच व दहा हजार मीटरवरून तो हळूहळू अर्ध मॅरेथॉन व पूर्ण मॅरेथॉनवर लक्ष केंद्रीत करीत आहे.

गेल्या महिन्यात दुबई येथे झालेल्या आशियाई अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत त्याने १ तास ५ मिनीटे २१ सेकंदात पाचवे स्थान मिळविले होते. यापूर्वी बेलीअप्पा व कार्तिक कुमार यंदा दिल्लीतील एका मॅरेथॉन स्पर्धेत आमने-सामने आले होते. त्यात बेलीअप्पाने बाजी मारली होती. त्यामुळे रविवारी होणाऱ्या शर्यतीत कार्तिक कुमार याची परतफेड करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

कालिदास, किरण, बाळूवर मदार

आयुर्विमा महामंडळात कार्यरत असलेला सातारचा कालिदास हिरवे हा आंतरराष्ट्रीय धावपटू असून सध्या नियमीतपणे अर्ध व पूर्ण मॅरेथॉनमध्ये नियमीतपणे सहभागी होत असतो. त्यामुळे त्याचा दमखम चांगला असला तरी शेवटच्या टप्यात आवश्यक असलेला वेग त्याच्याकडे किती आहे,

यावरून तो बेलीअप्पा व कार्तिकला किती आव्हान देऊ शकेल, हे दिसून येईल. किरण मेत्रे व बाळू पुकाले हे अजूनही पाच व दहा हजार मीटर शर्यतीचे धावपटू असल्याने एकप्रकारे ते अर्ध मॅरेथॉन शर्यतीत आपले नशिब अजमावत आहे. दोघांकडे २-३ अर्ध मॅरेथॉनचा अनुभव असला तरी तो अनुभवी धावपटूंपुढे किती पुरेसा ठरेल, हे प्रत्यक्ष शर्यतीत दिसून येईल.

निरमाला रेश्माची भीती

मुळ गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील हाजीपूर एका शेतकऱ्याची मुलगी असलेली निरमा ठाकोर महिलांच्या अर्ध मॅरेथॉन शर्यतीत आपल्या सर्वोत्तम कामगिरीबाबत आशावादी असली तरी तिच्या मते गतविजेती सातारची व सध्या पुण्यातच मंजुळा पाटील यांच्याकडे सराव करणारी रेश्मा केवटे हे प्रमुख प्रतिस्पर्धी राहू शकते.

गतवर्षी रेश्माने १ तास १७ मिनीटे ०६ सेकंदात शर्यत जिंकली होती. सध्या नाशिक येथे विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या २६ वर्षीय निरमाने यंदा विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भाग घेताना १ तास २० मिनीटे ५२ सेकंद अशी सर्वोत्तम वेळ दिलेली आहे.

तयारीविषयी रेश्मा म्हणाली, तयारी उत्तम आहे. गतवर्षीची विजेतेपद कायम ठेऊ शकले की नाही, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. कारण काही दिवसापूर्वी एका स्पर्धेत भाग घेतल्यानंतर तब्येत बरी नव्हती.

त्यातून आता तंदुरुस्त झाली असून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न राहील. याशिवाय मुळची उत्तर प्रदेशची चंद्रकला शर्मा, एकता रावत, नागपूरची आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती चौहान व सातारची आकांक्षा शेलार या सुद्धा शर्यतीत आपले आव्हान निर्माण करण्याच्या तयारीत आहेत.

पुण्याच्या वातावरणाचा पूर्ण अंदाज असून तयारीही उत्तम आहे. त्यामुळे १ तास ०४ मिनिटांच्या आसपास वेळ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मुख्य मॅरेथॉन शर्यतीत मी राष्ट्रीय विक्रम मोडण्यास सज्ज आहे, हे स्पष्ट होईल. ऑलिंपिकची पात्रता गाठणे आणि राष्ट्रीय विक्रम मोडीत काढणे हे ध्येय आहे.

- एबी बेलीअप्पा, अर्ध मॅरेथॉनचा स्पर्धक

सकाळ माध्यम समूह नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. पुणे हाफ मॅरेथॉन हा त्याचाच एक भाग आहे. कोरोनानंतर आरोग्याचे महत्त्व सर्वांनाच समजले आहे. हाच धागा पकडून मॅरेथॉन स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत इतर धावपटूंच्या जोडीला पोलिस बांधवही आवर्जून सहभागी होत असतात. या स्पर्धेसाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने विशेष काळजी घेण्यात आली आहे. ही स्पर्धा पुणेकरांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल आहे.

- विजय मगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT