Bajrang Punia Death Threat Esakal
क्रीडा

Bajrang Punia Death Threat:"...अन्यथा तुझे आणि कुटुंबाचे वाईट होईल," ऑलिम्पिक विजेत्याला जीवे मारण्याची धमकी

Bajrang Punia In Congress: दोन वेळा आशियाई चॅम्पियन, पुनियाने टोकियो 2020 मध्ये त्याच्या ऑलिम्पिक पदार्पणातच कांस्यपदक जिंकले होते.

आशुतोष मसगौंडे

ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून, त्याला जीवे मारण्याची धमकी आली आहे. व्हॉट्सॲपवर परदेशी क्रमांकावरून बजरंगला धमकी देण्यात आली आहे.

"बजरंग तू काँग्रेस सोडावी अन्यथा तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे वाईट होईल, हा आमचा शेवटचा मेसेज आहे," असे बजरंगला आलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये लिहिले आहे.

यानंतर बजरंगने सोनीपतमधील बहलगढ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही शुक्रवारी दिल्लीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याआधी या दोघांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेश फोगटने जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.

"काँग्रेसला आमचे अश्रू समजले. वाईट काळात तुमचा कोण आहे हे कळते. देशातील जनतेची सेवा करण्याची ही संधी आहे. नवीन इनिंग सुरू करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे," असे विनेश म्हणाली होती.

दरम्यान विनेशला जुलाना मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तर बजरंगला अखिल भारतीय किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले आहे.

काँग्रेसमध्ये प्रवेश करताना बजरंग म्हणाला होता की, "तो काँग्रेस आणि देशाला भक्कम करणार आहेत. भाजप आमच्या पाठीशी उभा राहिला नाही. काँग्रेसमध्ये आल्यावर टीका होत आहे."

कोण आहे बजरंग पुनिया?

बजरंग पुनियाचा जन्म २६ फेब्रुवारी १९९४ रोजी हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील खुदान गावात झाला. पुनियाने वयाच्या सातव्या वर्षी कुस्तीला सुरुवात केली. त्याच्या वडिलांनी त्याला यासाठी प्रोत्साहन दिले.

दोन वेळा आशियाई चॅम्पियन, 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आणि जागतिक चॅम्पियनशिप रौप्य पदक विजेता बजरंग पुनियाने टोकियो 2020 मध्ये त्याच्या ऑलिम्पिक पदार्पणातच कांस्यपदक जिंकले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT