IND vs BAN Women's T20 : बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमान संघाविरुद्धचे आपले वर्चस्व कायम राखले. सलग चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली. पावसाचा व्यत्यय आलेला हा सामना १४ षटकांचा झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने सहा बाद १२२ धावा केल्या त्यानंतर १४ षटकांत बांगलादेशला सात बाद ६८ धावांवर रोखले.
भारताकडून हरमनप्रीत कौर (३९) आणि रिचा घोष (२४) यांची ४४ धावांची भागीदारी मोलाची ठरली. त्याअगोदर सलामीवीर शेफाली वर्मा अवघ्या दोन धावांवर बाद झाल्यावर स्मृती मानधना आणि हेमलता यांनी प्रत्येकी २२ धावा केल्या होत्या. मात्र, त्या पाठोपाठ बाद झाल्यावर भारताची तीन बाद ६० अशी अवस्था झाली होती.
पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ पुढे सुरू झाल्यावर हरमनप्रीत आणि रिचा घोष संयमाबरोबर आक्रमकही फलंदाजी केली, त्यामुळे भारताला शतकी धावसंख्या पार करणे शक्य झाले. १४ षटकांत १२३ हे आव्हान कठीण नव्हते, त्यात बांगलादेशने एक बाद ३८ अशी सुरुवातही केली होती; परंतु त्यानंतर दीप्ती शर्मा आणि नवोदित आशा शोभना या फिरकी गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजीचे फासे आवळण्यास सुरुवात केली. या दोघींनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत : १४ षटकांत ६ बाद १२२ (स्मृती मानधना २२ -१८ चेंडू, ३ चौकार, दयालन हेमलता २२ -१४ चेंडू, २ चौकार, २ षटकार, हरमनप्रीत कौर ३९ - २६ चेंडू, ५ चौकार, रिचा घोष २४ -१५ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, मारुफा अख्तर ३-०-२४-२, रबिया खान ३-०-२८-२) वि. वि. बांगलादेश : १४ षटकांत ७ बाद ६८ (दिलारा अख्तर २१, रुबीया हैदर १३, पूजा वस्त्रकार ३-०-१५-१, दीप्ती शर्मा ३-०-१३-२, राधा यादव ३-१-१२-१, आशा शोभना ३-०-१८-२)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.