क्रीडा

ICC World Cup: इंग्लंडचा बांग्लादेशवर दणदणीत विजय, शतक झळकवणारा डेविड मलान ठरला सामनावीर

World Cup 2023: इंग्लंड आणि बांग्लादेश या सामन्यात इंग्लंडने बांग्लादेशचा धुव्वा उडवला आहे. इंग्लंडने बांग्लादेशचा १३८ धावांनी पराभव केला.

Manoj Bhalerao

World Cup 20023:आयसीसी विश्वचषक २०२३ स्पर्धेत बांग्लादेश आणि इंग्लंड या संघांमध्ये मंगळवारी (दि. १० ऑक्टोबर) धर्मशाळा या ठिकाणी सामना खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडने बांग्लादेशवर १३७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडच्या या विजयात फलंदाज आणि गोलंदाजांनी महत्वाची भूमिका बजावली.

इंग्लंडने जोरदार फलंदाजीच्या जोरावर ३६४ धावांचा डोंगर उभा केला तर, इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर बांग्लादेशच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. १०७ चेंडूत १४० धावा ठोकणाऱ्या डेविड मलान याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

बांग्लादेशने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय इंग्लंडसाठी लाभदायक ठरला. इंग्लंडच्या सलामीवीरांनी बांग्लादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पहिल्या विकेटसाठी जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान यांनी ११५ धावांची भागीदारी केली. बेअरस्टो बाद झाल्यानंतर आलेल्या जो रुटनेही वाहत्या पाण्य़ात हात धूवून घेत ८२ धावा कुटल्या.

डेविड मलानने १०७ चेंडूत १४० धावा केल्या, ज्यात त्याने ८ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकारांचा वर्षाव केला. निर्धारित ५० षटकांत इंग्लंडने बांग्लादेशला विजयासाठी ३६५ धावांच आव्हान दिलं.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेशची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर तंझिद हसन अवघी एक धाव करुन तंबूत परतला. त्यानंतर संघाला ३ झटके लागोपाठ बसले. रीस टॉप्लीने बांगलादेशच्या फलंदाजीच कंबरडं मोडलं. मुश्फिकुर रहीमने अर्धशतक झळकावलं पण संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यात तो अपयशी ठरला आणि संघ २२७ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडच्या रीस टॉप्लीने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT