Wimbledon Womens Final 2024 : झेक प्रजासत्ताकची बार्बोरा क्रेयचीकोव्हा आणि इटलीची जास्मीन पाओलिनी यांच्यात विम्बल्डन स्पर्धेतील महिला एकेरीची फायनल अटीतटीची झाली. बार्बोराने चुरशीच्या सामन्यात विजय मिळवून ग्रँड स्लॅम जेतेपद नावावर केले. जास्मीनला फ्रेंच ओपन नंतर २०२४ मध्ये सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बार्बोराने २०२१ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये एकेरीचे जेतेपद जिंकले होते आणि आजचे तिने दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद नावावर केले.
पहिला सेट बार्बोराने ६-२ असा सहज जिंकला, परंतु २०२१च्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या विजेत्या खेळाडूला कडवी टक्कर मिळाली. २८ वर्षीय जास्मीनने जबरदस्त पुनरागमन करताना दुसरा सेट ६-२ असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये बार्बोराने ५-३ अशी आघाडी घेतली होती आणि तिला फक्त एक गेम जिंकायचा होता. पण, जास्मीनने कडवी टक्कर देताना सेट ५-४ असा आणला. तरीही बार्बोराचे विजयाची हातची संधी होती.
जास्मीनने तिसऱ्या गेममध्ये ४०-३० अधी आघाडी मिळवून बार्बोरावर दडपण निर्माण केले. ४०-४० असे गुण समान झाले असताना बार्बोराने अडव्हान्टेज मिळवला. पण, जास्मीन हार मानण्यातली नव्हती आणि तिने अडव्हान्टेज आपल्याकडे खेचून आणला. दुर्दैवाने बॅकहँड एररमुळे जास्मीनला हा सेट गमवावा लागला आणि बार्बोराने ६-४ अशी बाजी मारून विम्बल्डन जेतेपद नावावर केले.
बार्बोराने २०१८ व २०२२ मध्ये विम्बल्डनचे महिला दुहेरीचे जेतेपदही पटकावले होते. २०२२ मध्ये दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत ती अव्वल क्रमांकावर होती, तर २०१८ मध्ये एकेरीत तिने कारकीर्दितील सर्वोच्च दुसरे स्थान पटकावले होते. सहा वर्षांची असताना तिने टेनिस खेळण्यास सुरुवात केली आणि याना नोव्होत्ना या तिच्या मार्गदर्शक आहेत. सलग सातव्या वर्षी विम्बल्डनमध्ये महिला एकेरीत सात वेगवेगळ्या खेळाडूंनी जेतेपद पटकावले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.