BCCI IPL 2021  file photo
क्रीडा

'IPL से इश्क है तो रिस्क है!' दोन नव्या संघासाठी BCCI चं टेंडर

ही रक्कम नापरतावाच्या स्वरुपात असेल. याची मुदत 5 ऑक्टोबरपर्यंत असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

सुशांत जाधव

BCCI tender For IPL New Team : आयपीएलच्या आगामी हंगामात (IPL2022) दोन नव्या संघांचा समावेश होणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. या चर्चेवर आता बीसीसीआने शिक्कामोर्तब केला आहे. आयपीएलमध्ये दोन नवे संघ सामील करण्यासाठी बीसीसीआयने निविदा मागवली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउंन्सिलच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. नवी टीम खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांना Inviation To Tender (ITT) च्या अंतर्गत 10 लाख रुपये भरावे लागणार आहेत. ही रक्कम नापरतावाच्या स्वरुपात असेल. याची मुदत 5 ऑक्टोबरपर्यंत असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या वृत्तानुसार, कोणतीही कंपनी 75 कोटी बोली लावून टीम खरेदी करु शकते. यापूर्वी दोन्ही नव्या संघांची आधारभूत किंमत 1700 कोटी रुपये इतकी होती. पण यात बदल करण्यात आला असून ती 2000 कोटी करण्यात आली आहे. जर बोली प्रक्रियेच्या योजनेनुसार पुढे सरकली तर बीसीसीआयला दोन नव्या टीममुळे जवळपास 5000 कोटी नफा मिळू शकतो. अनेक कंपन्या बोलीसाठी उत्सुक आहेत. सरशेवटी यात कोण बाजी मारणार ते येणारा काळच ठरवेल.

आयपीएलच्या 2022 च्या हंगामात नवे दोन संघ समाविष्ट झाल्यामुळे जवळपास 74 सामन्यांची स्पर्धा आयोजित करण्यात येईल. ज्या कंपनीचा टर्न ओव्हर 3000 कोटीच्या घरात आहे अशाच कंपनीला नवे संघ खरेदी करण्याच्या प्रक्रियेत समाविष्य करुन घेतले जाणार असल्याचेही बोलले जाते. बीसीसीआय कंपनीच्या समूहालाही या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे दोन नव्या संघ खरेदी करण्यासाठी चुरस पाहायला मिळेल, असे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT