Team India's squad for first two Tests against England News : इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना स्थान मिळाले नाही. त्याचबरोबर संघाबाहेर असलेला युवा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनलाही या संघात स्थान मिळालेले नाही.
मात्र, निवड समितीने उत्तर प्रदेशचा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलला संधी देऊन सर्वांनाच चकित केले आहे, जो पहिल्यांदाच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमचा भाग होणार आहे. श्रेयस अय्यरही संघात कायम आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार असून ती 11 मार्चपर्यंत चालणार आहे. लांबलचक मालिका पाहता बीसीसीआयने सध्या फक्त पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीसाठीच संघ जाहीर केला आहे. पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये तर दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे.(Team India's squad annouce for test match against England)
इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.