BCCI Selection Committee ESAKAL
क्रीडा

BCCI Selection Committee: टीम इंडियाच्या नव्या निवडकर्त्यांची घोषणा, 3 कसोटी अन् 5 वनडे खेळलेल्या खेळाडूवर मोठी जबाबदारी

Kiran Mahanavar

Team India BCCI Selection Committee : बीसीसीआयने महिला निवड समिती आणि ज्युनियर क्रिकेट समितीची घोषणा केली आहे. सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा ​​आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने श्यामा डी शॉ आणि व्हीएस टिळक नायडू यांच्या नावांची शिफारस केली होती.

भारतीय क्रिकेट बोर्डाने सोमवारी श्यामा आणि टिळक यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. श्यामा ही माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू आहे. श्यामाने भारतासाठी 3 कसोटी आणि 5 वनडे असे एकूण 8 सामने खेळले आहेत. 1985 ते 1997 पर्यंत ती पहिल्यांदा बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली. यानंतर 1998 ते 2002 दरम्यान त्यांनी रेल्वेचे प्रतिनिधित्व केले. क्रिकेट करिअरला अलविदा केल्यानंतर ती बंगालची सिलेक्टरही होती.

व्हीएस टिळक नायडू हे माजी भारतीय यष्टीरक्षक आणि फलंदाज आहेत. 1998 ते 2010 पर्यंत तो कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळला. दुलीप ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व केले. त्याने 93 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4386 धावा केल्या आहेत. 2013 ते 2016 पर्यंत ते कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या कनिष्ठ निवड समितीचे मुख्य निवडकर्ता होते. 2015-2016 हंगामात तो वरिष्ठ संघाचा निवडकर्ताही होता.

पुढील महिना भारतीय महिला संघासाठी अतिशय व्यस्त असणार आहे. पुढील महिन्यात, संघ 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा करणार आहे. यानंतर सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर 3 एकदिवसीय आणि तितक्याच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल.

ऑक्टोबरमध्ये भारत न्यूझीलंडचेही यजमानपद भूषवेल आणि त्यानंतर भारतीय महिला संघ डिसेंबरमध्ये इंग्लंडला रवाना होईल. वर्षाच्या शेवटी, भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबत एक कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

  • महिला निवड समिती : नीतू डेव्हिड, रेणू मार्गारेट, आरती वैद्य, कल्पना व्यंकटाचा, श्यामा डी शॉ

  • ज्युनियर क्रिकेट समिती : व्हीएस टिळक नायडू अध्यक्ष, रणदेव बोस, हरविंदर सिंग, पथिक पटेल, कृष्ण मोहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT