Jay Shah esakal
क्रीडा

BCCI Meeting : बीसीसीआय बैठक घेणार; भारतीय खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळणार?

अनिरुद्ध संकपाळ

BCCI Meeting Indian Players overseas leagues : आयसीसीने काही दिवसांपूर्वीच भारतात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले. यंदाचा वनडे वर्ल्डकप हा पूर्णपणे भारतात होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय हे सामने यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी जय्यत तयारी करत आहे.

दरम्यान, बीसीसीआय येत्या 7 जुलैला आपल्या अॅपेक्स काऊन्सीलची बैठक घेणार आहे. या बैठकीत भारताच्या एशिय गेम्समधील सहभागाबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे. याचबरोबर भारताच्या निवृत्त झालेल्या खेळाडूंना परदेशातील लीग स्पर्धा खेळण्याची परवानगी देण्याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.

स्पोर्ट्स तकने दिलेल्या माहितीनुसार येत्या सात जुलैला बीसीसीआय अॅपेक्स काऊन्सीलची बैठक होणार आहे. या बैठकीत खालील मुद्यांवर चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • भारताच्या निवृत्त झालेल्या खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देणे

  • एशियन गेम्समधील भारतीय संघाचा सहभाग

  • सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू करता येऊ शकतो का?

  • मीडिया आणि स्पॉन्सरशिप हक्क

  • मैदानांचे नुतनिकरण

  • महिला आणि पुरूष संघातील खेळाडूंच्या कराराला मान्यता देणे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: ''ते' पुस्तक मी वाचणार अन् माझ्या वकिलांनाही देणार'', ईडीच्या भीतीबाबत भुजबळांचा पत्रकार परिषदेत खुलासा

Aligarh Muslim University ला अल्पसंख्याकांचा दर्जा, सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

मगरी, शार्क असलेल्या नदीत पडले Ian Botham; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने वाचवले अन्यथा...

Latest Maharashtra News Updates : अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याकांचा दर्जा - SC

Sawantwadi Election : शिवसेनेच्या उमेदवारीवर नारायण राणे शेवटचे लढले, अटीतटीची 'ती' निवडणूक ठरली लक्षवेधी

SCROLL FOR NEXT