भारतीय महिला संघातील अनुभवी खेळाडू आणि कर्णधार मिताली राजसोबतच्या वादामुळे कोचपदावरुन पायउतार झालेले रमेश पोवार पुन्हा एकदा महिला टीमला कोचिंग करताना दिसणार आहेत. भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मदन लाल यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार कमिटीने (BCCI Cricket Advisory Committee) गुरुवारी रमेश पोवार यांच्या नावाची शिफारस केल्याचे वृत्त आहे. बीसीसीआय (BCCI) कडून लवकरच यासंदर्भात घोषणा करण्यात येईल.
भारतीय संघातील माजी फिरकीपटू रमेश पोवार (Ramesh Powar) यांनी यापूर्वी महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. 2018 मध्ये त्यांच्याकडे भारतीय महिला संघाच्या मुख्य कोचची जबाबदारी देण्यात आली होती. टी-20 वर्ल्ड कपदरम्याने रमेश पोवार आणि अनुभवी खेळाडू मिताली राज यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर रमेश पोवारांना पदावरुन हटवण्यात आले होते.
तुषार आरोठे यांच्या जागी 2018 मध्ये रमेश पोवार यांची भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावर निवड झाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला क्रिकेट संघाने टी 20 वर्ल्ड स्पर्धेत सेमीफायनल गाठली होती. भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर मिताली राज आणि कोच रमेश पोवार यांच्यातील वाद समोर आला होता.
एप्रिलमध्ये बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले होते. डब्लू व्ही रमण यांचा करार ऑक्टोबरमध्ये संपुष्टात आला. घरच्या मैदानावर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांचा कालावधी वाढण्यात आला होता.
भारतीय महिला क्रिकेट संघ 2 जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात एका कसोटी सामन्यास तीन टी-20 आणि 3 वनडे सामने नियोजित आहेत. या दौऱ्यात रमेश पोवार संघाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसतील.
CAC recommends Ramesh Powar as India womens head coach
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.