BCCI Chief Roger Binny Shahid Afridi : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये आयसीसीवर भारताच्या बाजूने निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे. दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगितले. रॉजर बिन्नी म्हणाले की, आयसीसीसाठी सर्व संघ समान आहेत. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळण्याबाबत ते म्हणाले की, ते बीसीसीआयच्या हातात काही नाही. दोन्ही देशांच्या सरकारांनी यासाठी परवानगी दिल्यास याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
बांगलादेश आणि भारत यांच्यातील सामन्यानंतर पाकिस्तानमधील माध्यमांशी संवाद साधताना आफ्रिदी म्हणाला, "आयसीसीला कोणत्याही परिस्थितीत भारताला विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत पोचवायचे आहे. बांगलादेशची फलंदाजी चालू असताना ७ व्या षटकात पाऊस आला. काही वेळानंतर लगेच खेळ सुरू करण्यात आला, मात्र मैदान मोठ्या प्रमाणात ओले होते. डकवर्थ लुईस नियमानुसार त्या क्षणी बांगलादेशने भारताचा पराभव केला होता; परंतु आवश्यकता नसतानाही पंचांनी खेळ सुरू केला आणि भारताचा विजय कसा होईल याची खात्री बाळगली. पाकिस्तान आणि भारताच्या सामन्यातसुद्धा तेच पंच होते, त्यामुळे या दोघांना उत्कृष्ट पंच म्हणून गौरविण्यात येणार आहे, असा टोलाही आफ्रिदीने लगावला.
बीसीसीआयला पाठिंबा देण्याच्या आयसीसीच्या आरोपावर बिन्नी म्हणाले की, हे बरोबर नाही. मला वाटत नाही की आयसीसी आम्हाला पाठिंबा देत आहे. प्रत्येकाला समान वागणूक दिली जाते. तुम्ही असे कोणत्याही प्रकारे म्हणू शकत नाही. बाकीच्या संघांपेक्षा काय वेगळे करते. भारत हा क्रिकेटमध्ये मोठा आणि शक्तिशाली देश आहे, पण आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाते.
यानंतर बिन्नीला विचारण्यात आले की भारतीय संघ 2023 आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार का? त्याला उत्तर देताना ते म्हणाले, हे बीसीसीआयच्या हातात नाही. ते सरकार पाहिलं. त्यांना या प्रकरणी परवानगी द्यावी लागेल. रॉजर बिन्नी हे नुकतेच बीसीसीआयचे अध्यक्ष झाले आहेत. सौरव गांगुलीच्या जागी त्यांनी हे पद स्वीकारले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.