Virat Kohli Rohit Sharma T20 Career  esakal
क्रीडा

Virat Kohli Rohit Sharma : कोणालाही वेगळा न्याय नाही; रोहित - विराटची T20 कारकीर्द आगरकरच्या हाती?

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Rohit Sharma : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचा संक्रमण काळ सुरू होणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. बीसीसीआय येणारे नवीन निवडसमिती प्रमुख हे भारताचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह संघातील रविचंद्रन अश्विन सारख्या वरिष्ठ खेळाडूंशी त्यांच्या टी 20 भविष्याबाबत चर्चा करणार आहे.

बीसीसीआय निवडसमिती अध्यक्षपदाच्या शर्यतीत भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचे नाव आघाडीवर आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या सहाय्यक प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला असून त्याने निवडसमिती सदस्यपदासाठी अर्ज देखील केला आहे.

भारतीय टी 20 संघात संक्रमणाचा काळ सुरू झाल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. भारताचे दोन दिग्गज फलंदाजांना अप्रत्यक्षरित्या टी 20 संघात डच्चू दिल्याचे संकेत बीसीसीआयने अनेकवेळा दिले आहेत. टी 20 वर्ल्डकपनंतर विराट कोहली आणि रोहित शर्माला सातत्याने टी 20 मालिकांसाठी विश्रांती देण्यात येत आहे.

दरम्यान,बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला सांगितले की, 'निवडसमिती प्रमुखाचे खेळाडूंच्या भविष्यातील प्लेन्सविषयी चर्चा करणे हे एक कामच असते. रोहित आणि विराट कोहली या दोघांना वेगळा न्याय नाहीये. त्यांना जोपर्यंत खेळायचं आहे तोपर्यंत त्यांनी खेळावे असे आम्हाला वाटते.'

'मात्र प्रत्येक ग्रेट प्लेअरला त्याच्या भविष्याबाबत योजना आखावी लागतेच. तीनही क्रिकेट फॉरमॅट, आयपीएल खेळणे हे सोपे काम नाही.'

बीसीसीआयचा अधिकारी पुढे म्हणाला की, 'एकदा का वनडे वर्ल्डकप झाला की सर्वांचे लक्ष हे टी 20 कडे असणार आहे. भारताने 2007 पासून टी 20 वर्ल्डकप जिंकलेला नाही. आता हा विषय प्रामुख्याने चर्चेत असतो. आयपीएल वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत भारताने टी 20 वर्ल्डकप जिंकणे हा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.

'आयपीएलमधून चांगले चांगले खेळाडू मिळत आहेत. तरी देखील आपण टी 20 वर्ल्डकप नाही जिंकला तर ते चांगले दिसत नाही. वनडे वर्ल्डकप झाला की निवडसमितीकडून टी 20 साठी एक आराखडा आखला जाईल.'

निवडसमिती अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आघाडीवर असलेला अजित आगरकर हा टी 20 क्रिकेट खेळला असून आयपीएलमध्ये प्रशिक्षकाची भुमिका देखील बजावली आहे. त्यामुळे टी 20 क्रिकेट नव्या वळणावर जात असताना तो निवडसमिती अध्यक्ष म्हणून एकदम योग्य उमदेवार ठरू शकतो.

लिस्टमध्ये कोणा कोणाची नावे?

  • रोहित शर्मा

  • विराट कोहली

  • रविचंद्रन अश्विन

  • मोहम्मद शमी

  • भुवनेश्वर कुमार

  • केएल राहुल

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT