IPL Impact Player BCCI  esakal
क्रीडा

IPL Impact Player : भारतीय इम्पॅक्ट प्लेअरच खेळवता येणार; बीसीसीआयने केले स्पष्ट

अनिरुद्ध संकपाळ

IPL Impact Player BCCI : आयपीएल 2023 मध्ये बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेअर ही संकल्पना राबवणार आहे. आता कर्णधाराला आपल्या प्लेईंग 11 सोबतच 4 इम्पॅक्ट प्लेअर खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. यातील एकच इम्पॅक्ट प्लेअर सामन्यावेळी संघात खेळू शकतो. दरम्यान, बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेअर ही संकल्पना आयपीएलमध्ये राबवताना ते सर्व खेळाडू हे भारतीय असतली असे स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयने सांगितले की, 'आयपीएलमध्ये भारतीयच खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळतील.' याबाबत अधिक स्पष्टपणे सांगताना बीसीसीआय म्हणते की, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून विदेशी खेळाडू फक्त जर संघाने प्लेईंग 11 मध्ये 4 पेक्षा कमी खेळाडू खेळवले असतील तरच खेळवता येणार आहे. जर संघात आधीच चार विदेशी खेळाडू खेळत असतील तर इम्पॅक्ट प्लेअरमध्ये विदेशी खेळाडूचे नाव घालता येणार नाही. जर एखाद्या संघाने विदेशी खेळाडूचे नाव इम्पॅक्ट प्लेअर लिस्टमध्ये समाविष्ट केले तर त्यांना कोणत्या परिस्थिती पाच विदेशी खेळाडू मैदानावर उतरवात येणार नाहीत.'

इम्पॅक्ट प्लेअर एकदा का एका खेळाडूच्या बदल्यात मैदानात आला तर ज्या खेळाडूच्या बदल्यात इम्पॅक्ट प्लेअर संघात आलेला आहेत त्या खेळाडूला पुन्हा सामन्यात सहभागी होता येणार नाही. याचबरोबर त्याला बदली क्षेत्ररक्षक म्हणून देखील मैदानात उतरता येणार नाही.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT