BCCI extend Rahul Dravid Stint as Head Coach sakal
क्रीडा

Rahul Dravid : BCCI ने कोच राहुल द्रविडबाबत दिली मोठी अपडेट; रोहित-अजितची विनंती केली मान्य

Kiran Mahanavar

BCCI extend Rahul Dravid Stint as Head Coach : सर्व अटकळांना पूर्णविराम देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक असणार असल्याची घोषणा केली आहे. 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्याचा करार संपला होता.

बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ वाढवला आहे. त्याचबरोबर कोचिंग स्टाफमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ द्रविड मुख्य प्रशिक्षकच राहणार आहे. विक्रम राठोड हे फलंदाजी प्रशिक्षक, पारस म्हांबरे गोलंदाजी प्रशिक्षक आणि टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कायम राहतील.

नुकत्याच संपलेल्या वर्ल्ड कपनंतर कराराचा कालावधी संपल्यानंतर बीसीसीआयने राहुल द्रविडशी चर्चा केली आणि कार्यकाळ वाढवण्यास सर्वानुमते सहमती दर्शवली, असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जारी केले. भारतीय संघाच्या उभारणीत द्रविडची भूमिका महत्त्वाची आहे.

जून 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. 2023 च्या वर्ल्ड कपनंतर द्रविडचा कार्यकाळ संपला होता. यानंतर माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराला टी-20 संघाचे प्रशिक्षक बनवण्याची चर्चा होती, मात्र त्यांनी याला नकार दिला.

द्रविडच्या कोचिंगमध्ये भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचला. टीम इंडिया सध्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियासोबत टी-20 मालिका खेळत आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण या मालिकेसाठी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. संघाला पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचे आहे. या मालिकेतून द्रविड पुनरागमन करणार आहे. या मालिकेत 3 टी-20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT