BCCI Group D Umpiring Exam Out Of 140 Candidate Only 3 Pass The Exam esakal
क्रीडा

Cricket Umpire : BCCI ची अंपायरिंग परीक्षेत गुगली, 140 पैकी फक्त 3 झाले पास

अनिरुद्ध संकपाळ

BCCI Group D Umpiring Exam : क्रिकेटमध्ये नवनव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे फिल्ड अंपायरचे काम सोपे झाले आहे. त्यामुळे अंपायर आता फक्त मैदानावर उभे राहून गलेलठ्ठ मानधन मिळवत आहेत असा काहींचा समजही देखील झाला असेल. मात्र बीसीसीआयने नुकतीच अंपायरिंगची ग्रुप 'ड' ची परीक्षा घेतली. या परीक्षेत 140 जणांनी आपले क्रिकेटचे ज्ञान पणाला लावले. मात्र बीसीसीआयच्या तीन प्रश्नांच्या गुललीवर यातील 137 जणांच्या दांड्या गुल झाल्या. बीसीसीआयच्या या कठिण परीक्षेत फक्त 3 जण पास होऊ शकले. (BCCI Group D Umpiring Exam Out Of 140 Candidate Only 3 Pass The Exam)

बीसीसीआयने महिला आणि ज्युनियर स्तरावरील (ग्रुप 'ड') अंपायरिंगसाठी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत जवळपास 40 अवघड प्रश्न विचारण्यात आले. बीसीसीआयने या परीक्षेतील प्रश्न अवघड असल्याचे मान्य केले होते. मात्र बीसीसीआयने गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे सांगितले.

बीसीसीआयच्या अवघड प्रश्नांचे तीन नमुने :

1 - जर पॅव्हेलियनच्या काही भागाची सावली, झाड किंवा क्षेत्ररक्षकाची सवली खेळपट्टीवर पडली आणि फलंदाजाने त्याची तक्रार केली तर त्यावेळी तुम्ही काय कराल?

योग्य उत्तर : पॅव्हेलियन आणि झाडाच्या सावली फारशी विचारात घेतली जाणार नाही. मात्र क्षेत्ररक्षकाला स्थीर राहण्यास सांगितले जाईल नाहीतर चेंडू डेड बॉल म्हणून घोषित केला जाईल.

2 - तुम्हाला वाटले की गोलंदाजाच्या हाताला झालेली दुखापत योग्य आहे. जर त्याने पट्टी लावली नाही तर रक्त येऊ शकते. अशावेळी तुम्ही गोलंदाजाला पट्टी हटवून गोलंदाजी करण्यास सांगाल का?

योग्य उत्तर : जर गोलंदाजाला गोलंदाजी करायची असेल तर त्याला हाताला लावलेली पट्टी काढावी लागले.

3 - एका वैध चेंडूवर एका फलंदाजाने एक फटका खेळला. तो फटका शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हेलमेटमध्ये अडकला. बॉलमुळे हेलमेट खाली पडले मात्र चेंडू खाली जमीनीवर पडण्याआधच फिल्डरने तो कॅच केला तर फलंदाजाला तुम्ही बाद ठरवणार का?

योग्य उत्तर : नॉट आऊट दिलं जाईल.

बीसीसीआयने अंपायरिंगच्या परीक्षेत असे अनेक डोकं खाजवायला लावणारे प्रश्न विचारले. बीसीसीआयने ही परीक्षा तीन भागात घेतली होती. यात प्रॅक्टिकल, मुलाखत आणि तिसऱ्यात व्हिडिओ आणि लेखी परीक्षा यांचा समावेश होता. अनेक अंपायर लेखी परीक्षेत नापास झाले.

या परीक्षेबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, परीक्षा नक्कीच अवघड होती. मात्र आम्ही गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू इच्छित नाही. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावरील सामन्यात अंपायरिंग करायची असेल तर चुकीला माफी नाही. खेळाची जाण आणि नियमांचे पूर्ण ज्ञान खूप आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwa: केजरीवालांना मोठा धक्का! दिल्ली सरकारच्या मंत्र्याने दिला राजीनामा; भाजपचं नाव घेत पक्षावर आरोप

बापाच्या जिवावर कॉन्‍ट्रॅक्‍टर झालेल्या नारळफोड्याने माझ्यासमोर उभं राहून दाखवावं; आमदार गोरेंचा कोणाला इशारा?

बाप'माणूस! सरकारी रुग्णालयातील अग्निकांडात याकूबने परक्यांच्या बाळांना वाचवले, मात्र आपल्या जुळ्या मुली गमावल्या...

Chh. Sambhajinagar Crime : नऊ तोळे सोने मोडले दुसऱ्याच्या नावाने, यशस्विनी पतसंस्थेच्या घोटाळ्याची न्यायालयात माहिती

'Rishabh Pant ला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा वाटलं परत क्रिकेट...', रवी शास्त्रींनी सांगितली आठवण

SCROLL FOR NEXT