bcci sakal
क्रीडा

Ind Vs Sa: दिल्ली T-20 सामन्यासाठी BCCI ने बदलले नियम

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेची सुरुवात होणार आहे. पहिला मॅच दिल्ली येथे खेळवण्यात येणार आहे.

धनश्री ओतारी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेची सुरुवात होणार आहे. पहिला मॅच दिल्ली येथे खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, मोठी माहिती समोर आली आहे. सामन्यापूर्वी बीसीसीआयने नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. त्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी २० मालिकेतील पहिला थरार अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी जून महिन्यात दिल्लीत क्वचितच कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला असेल. राजधानीत सध्या कडक ऊन असल्याने दोन्ही संघातील खेळाडू नाराज झाले आहेत.

याच पार्श्वभूमिवर बीसीसीआयने दिल्लीच्या उन्हापासून खेळाडूंना वाचवण्यासाठी सामन्यादरम्यान 10 षटकांनंतर ड्रिंक ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दोन्ही संघातील खेळाडूंना दिलासा देणारा आहे. अशा परिस्थितीत बोर्डाच्या या निर्णयाचे दोन्ही संघांनी स्वागत केले.

खरतंर टि २० सामन्यादरम्यान कोणताही ब्रेक घेतला जात नाही. मात्र, दिल्लीतील तापमानाची परिस्थिती पाहता बीसीसीआयने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा दिल्लीच्या उकाड्याने चांगलाच अस्वस्थ आहे. कर्णधार टेम्बा बावुमाने यासंदर्भात खंत व्यक्त केली आहे.

“आम्हाला इथे उकाडा असेल अशी अपेक्षा होती, पण इतकी गरमी असेल हे माहीत नव्हते. हे सामने रात्री खेळवले जात आहेत हे चांगले आहे, कारण ही उष्णता रात्रीही सहन करता येते. दिवसा लोक स्वतःची काळजी घेत आहेत. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या आणि मानसिकदृष्ट्या जास्तीत जास्त ताजेतवाने राहा. असे आवाहन टेम्बा बावुमाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT