BCCI Injury Management Policy IPL Franchise esakal
क्रीडा

Team India : बीसीसीआयच्या नव्या पॉलिसीने IPL संघाची झालीये चांगलीच अडचण; रोहित, बुमराह, हार्दिक आता...

अनिरुद्ध संकपाळ

BCCI Injury Management Policy IPL Franchise : बीसीसीआयने आपल्या रिव्ह्यू मिटिंगमध्ये दुखापतग्रस्त भारतीय संघासाठी एक पॉलिसी राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या पॉलिसीअंतर्गत बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीला आदेश दिले आहेत की त्यांनी आयपीएल फ्रेंचायजींबरोबर खेळाडूंच्या फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंटवर काम करायचं आहे. आता खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवण्यासाठी एनसीए आयपीएल 2023 मध्ये फ्रेंचायजींच्या संपर्कात राहणार आहे.

याचा अर्थ भारतीय संघातील रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रोहित शर्मासह अनेक खेळाडूंना आयपीएल खेळण्याची 'सशर्त' परवानगी मिळणार आहे. यामुळे खेळाडूंवर करोडो रूपयांची उधळण करून बसलेल्या फ्रेंचायजींची मोठी अडचण झाली आहे. त्यांना आता दुखापतीतून नुकत्याच सावरलेल्या स्टार खेळाडूंना काही सामन्यात सक्तीने बेंचवर बसवावे लागणार आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराहच या नव्या पॉलिसीमुळे काही सामने बेंचवर बसू शकतात. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या देखील याच यादीत मोडतो त्यामुळे तो देखील गुजरातकडून सगळे सामने खेळले याची शाश्वती नाही. चेन्नईचे दीपक चाहर आणि रविंद्र जडेजा देखील नुकतेच दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे सीएसकेला त्यांच्याबाबतही सावधपणे पावले टाकावी लागणार आहेत. (Sports Latest News)

याबाबत एका आयपीएल फ्रेंचायजीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'ही खूप गंतागुंतीची पॉलिसी आहे. यामुळे अडचण निर्माण होऊ शकतो. फ्रेंचायजीच खेळाडूच आयपीएल बेस्ट बनवतात. खेळाडूंची काळजी घेणे महत्वाचेच आहे. कोणालाही दीपक चाहर आणि श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूंनी संपूर्ण आयपीएल बाहेर बसणे आवडणार नाही. ते आयपीएल ब्रँडसाठी महत्त्वाचेच आहेत.'

'याचबरोबर आम्हाला आता त्यांचे वर्कलोड मॅनेजमेंट काळजीपूर्वक हाताळावे लागणार आहे जेणेकरून त्यांना दुखापती होणार नाहीत. यात त्यांना विश्रांती देणे आणि त्यांचा वापर काळजीपूर्वक करणे याचा समावेश असणार आहे.'

हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

'ही खूप गंतागुंतीची पॉलिसी आहे. यामुळे अडचण निर्माण होऊ शकतो. फ्रेंचायजीच खेळाडूच आयपीएल बेस्ट बनवतात. खेळाडूंची काळजी घेणे महत्वाचेच आहे. कोणालाही दीपक चाहर आणि श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूंनी संपूर्ण आयपीएल बाहेर बसणे आवडणार नाही. ते आयपीएल ब्रँडसाठी महत्त्वाचेच आहेत. याचबरोबर आम्हाला आता त्यांचे वर्कलोड मॅनेजमेंट काळजीपूर्वक हाताळावे लागणार आहे जेणेकरून त्यांना दुखापती होणार नाहीत. यात त्यांना विश्रांती देणे आणि त्यांचा वापर काळजीपूर्वक करणे याचा समावेश असणार आहे.'
आयपीएल फ्रेंचायजीचा पदाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT