bcci major indian cricket venues miss out on hosting matches in odi world cup 2023 sakal
क्रीडा

ODI World Cup Update: बीसीसीआयकडून मलमपट्टी; वर्ल्डकपमध्ये स्थान न मिळालेल्या ठिकाणी आंंतरराष्ट्रीय लढती

BCCI News : एकदिवसीय विश्‍वकरंडकाचे आयोजन; स्पर्धेतील लढतींच्या आयोजनाचा मान भारतातील दहा स्टेडियम्सला देण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतामध्ये ऑक्टोबर - नोव्हेंबर यादरम्यान एकदिवसीय विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील लढतींच्या आयोजनाचा मान भारतातील दहा स्टेडियम्सला देण्यात आला आहे.

तसेच दोन स्टेडियम्सवर सराव लढती होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच विश्‍वकरंडकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर ज्या स्थळांना (स्टेडियम्स) लढतींचा मान देण्यात आला नाही, त्यांच्याकडून निराशा व्यक्त करण्यात आली होती; मात्र आता बीसीसीआयकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार ज्या ठिकाणांना विश्‍वकरंडकाच्या लढतींच्या आयोजनाचा मान मिळालेला नाही, अशा ठिकाणी घरच्या मोसमातील आंतरराष्ट्रीय लढती (विश्‍वकरंडक वगळता) खेळवण्यात येणार आहेत.

भारतामध्ये ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर यादरम्यान विश्‍वकरंडक खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या लढती दहा ठिकाणी होणार आहेत. यामध्ये दिल्ली, धर्मशाला, चेन्नई, कोलकता, मुंबई, पुणे, हैदराबाद,

अहमदाबाद, बंगळूर, लखनौ या शहरांतील स्टेडियम्सचा समावेश आहे. २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर यादरम्यान सराव लढतींचे आयोजन करण्यात येणार आहे. या सराव लढती गुवाहाटी व तिरुअनंतपूरम येथे होतील.

बीसीसीआयचे सचिव जय शहा याप्रसंगी म्हणाले, विश्‍वकरंडकाचे वेळापत्रक जाहीर करण्याआधी बीसीसीआयची बैठक पार पडली. विश्‍वकरंडकाच्या लढती ज्या ठिकाणी होणार आहेत, त्या संघटनांना सांगण्यात आले की, घरच्या मोसमातील आगामी आंतरराष्ट्रीय लढतींचे आयोजन तुम्हाला करता येणार नाही.

ज्यांना विश्‍वकरंडकातील लढतींच्या आयोजनाचा मान मिळालेला नाही, त्यांच्या येथे इतर आंतरराष्ट्रीय लढती खेळवण्यात येतील. वर्ल्डकप लढतींचे आयोजन करणाऱ्या संघटनांनी याला होकार दाखवला, असे जय शहा यांनी स्पष्ट सांगितले.

भारतातील यंदाचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक (विश्‍वकरंडक वगळता)

  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका (सप्टेंबर)

  • अफगाणिस्तानविरुद्ध मालिका (निश्‍चित नाही)

  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका (जानेवारी)

  • इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका (५ कसोटी)

  • बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका (२ कसोटी)

  • न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका (३ कसोटी)

या स्टेडियम्सवर लढती होणार

भारतात या मोसमात वर्ल्डकप वगळता इतर मालिकाही होणार आहेत. यामुळे भारतातील इतर ठिकाणांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यानुसार आता नागपूर, मोहाली, राजकोट, इंदूर, रांची, रायपूर व कटक या ठिकाणी या लढतींचे आयोजन करण्यात येऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT