BCCI New Selection Committee : ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपमधील भारताच्या पराभवानंतर बीसीसीआयने अॅक्शन मोडमध्ये येत संपूर्ण निवडसमिती बर्खास्त केली होती. मात्र काही आठवड्यातच यू टर्न घेत जुन्या निवडसमितीचे अध्यक्ष चेतन शर्मा आणि हरविंद्र सिंग यांना नव्या निवडसमितीत स्थान दिले. आता चेतन शर्माच दोन वर्षे निवडसमितीचे चेअरमन असणार आहे. दमरम्यान, क्रिकेट सल्लागार समितीने चेतन शर्मांपेक्षा अनुभवी असलेल्या व्यंकटेश प्रसादच्या नावावर खाट मारली.
याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, 'व्यंकटेश प्रसादचे नाव शॉर्टलिस्ट केलेल्या निवडसमिती सदस्यांमध्ये नाहीये. हा निर्णय संपूर्णपणे क्रिकेट सल्लागार समितीचा आहे. त्यामुळे व्यंकटेश प्रसादला का स्थान देण्यात आले नाही हे तेच सांगू शकतात.'
बीसीसीआयकडे पाच निवडसमिती सदस्यांच्या रिक्त जांगांसाठी तब्बल 200 अर्ज आले होते. टी 20 वर्ल्डकपनंतर बीसीसीआयने संपूर्ण निवडसमिती बर्खास्त केली होती. मात्र नंतर जुन्या निवडसमितीमधील चेतन शर्मा आणि हरविंदर सिंग यांना दुसरी संधी देण्यात आली आहे.
क्रिकेट सल्लागार समितीने शॉर्टलिस्ट केलेली यादी
चेतन शर्मा
हरविंदर सिंग
अमय खुरासिया
अजय रात्रा
एसएस दास
श्रीधरन शरथ
कोनोर विलियम्स
सलिल अंकोला
बीसीसीआय अधिकारी चेतन शर्मांना दुसरी संधी देण्याबाबत म्हणाले की, 'ही काही दुसरी संधी नाहीये तर ते इतरांपेक्षा जास्त ते जास्त योग्य आहेत. क्रिकेट सल्लागार समितीने त्यांच्या शिफारसी सादर केल्या आहेत. बीसीसीआय याच्यावर विचार करेल आणि या आठवड्यात नव्या निवडसमितीची घोषणा करेल. चेतन शर्मा हे अनुभवी आहेत आणि समितीचे नेतृत्व करत आहेत. त्यांना भारताच्या वर्ल्डकप 2023 च्या तयारीची चांगली माहिती आहे. त्यामुळे अचानक मोठे बदल न करत त्यांना कायम ठेवण्यात आले आहे.'
हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.