MS Dhoni : आयसीसी टूर्नामेंटमध्ये वारंवार अपयश आल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड आता ऍक्शन मोडमध्ये आली आहे. भारतीय संघात आता मोठे बदल दिसु शकतात. बीसीसीआय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भारतीय क्रिकेटमध्ये मोठी भूमिका देऊ शकते. ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषकातील पराभवानंतर BCCI भारतीय टी-20 क्रिकेट सेटअपसह मोठ्या भूमिकेसाठी एमएस धोनीशी संपर्क करत आहे.
हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?
बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड धोनीला भारतीय क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी भूमिकेसाठी बोलावण्याचा विचार केला आहे. धोनीला डॉयरेक्टर ऑफ क्रिकेट पदी नियुक्त केले जाऊ शकते. ‘द टेलिग्राफ’च्या अहवालानुसार, प्रशिक्षक राहुल द्रविडला तिन्ही फॉरमॅटचे व्यवस्थापन करण्याचा भार खूप आहे त्यामुळे बीसीसीआय प्रशिक्षकपदाची भूमिका विभाजित करण्याचा विचार करत आहे. धोनीचा टी-20 फॉरमॅटमध्ये समावेश करून भारतीय क्रिकेट संघाचा स्तर उंचावण्याची जबाबदारी बोर्ड देऊ शकते. अहवालानुसार, या महिन्याच्या अखेरीस सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाणार आहे.
एमएस धोनी UAE मधील टी-20 विश्वचषक 2021 दरम्यान संघासोबत काम केले पण तो अंतरिम भूमिकेत होता. जवळपास आठवडाभराचा सहभाग असूनही, निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. भारतीय संघ सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये बाद झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता.
बीसीसीआयला वाटते की धोनीच्या मोठ्या भूमिकेमुळे भारतीय टी-20 मध्ये निश्चितपणे मदत होईल. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलनंतर धोनी खेळातून निवृत्त होणार असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. बीसीसीआय त्याच्या अनुभवाचा आणि तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर करण्यास उत्सुक असून यामध्ये भारताच्या माजी कर्णधाराचाही समावेश असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.