Team India BTS Video eSakal
क्रीडा

Team India Video : सेमी-फायनल जिंकल्यानंतर कसा होता ड्रेसिंग रुममधील माहोल? BCCI ने शेअर केला भन्नाट व्हिडिओ!

ICC World Cup : 19 नोव्हेंबरला होणारा अंतिम सामना हा भारत वि. ऑस्ट्रेलिया असा होणार असल्याचं निश्चित झालं आहे.

Sudesh

Team India BTS post Semi-Final Win : सध्या सगळीकडे आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकपची चर्चा सुरू आहे. बुधवारी झालेल्या सेमी-फायनल सामन्यात भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवून दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला होता. यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये कसा माहोल होता, याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

BCCI ने आपल्या वेबसाईटवर हा टीम इंडियाचा BTS, म्हणजेच बिहाईंड द सीन्स व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये न्यूझीलंडसोबत झालेल्या सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कसं वातावरण होतं, खेळाडूंनी कसा आनंद साजरा केला हे दिसत आहे.

मॅचनंतर ड्रेसिंग रुममध्ये हे खेळाडू एकमेकांना आनंदाने आलिंगन देताना दिसत आहेत. सोबतच ते एकमेकांचं अभिनंदनही करत आहेत, ऑटोग्राफ देखील देत आहेत. ड्रेसिंग रुममध्ये युजवेंद्र चहल देखील आलेला व्हिडिओमध्ये दिसत आहे. या लिंकवर क्लिक करुन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकाल.

फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार

गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने देखील फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. यामुळे 19 नोव्हेंबरला होणारा अंतिम सामना हा भारत वि. ऑस्ट्रेलिया असा होणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे 2003 सालचा बदला घेत, ऑस्ट्रेलियाला हरवून विश्वचषकावर आपलं नाव कोरण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT