Chetan Sharma Sting Operation : भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याच्या एका मुलाखतीने भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
एका न्यूज चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी भारताच्या संघ निवडीबाबतची गुप्त आणि संवेनशील माहिती सार्वजनिक केली. भारतीय निवड समितीने खेळाडूंचा फिटनेस, विराट कोहलीच्या कर्णधारपदाचा वाद, रोहित शर्माचे भविष्य अशा अनेक मुद्द्यांवर खुलासे केले.
भारतीय क्रिकेटपटू स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी इंजेक्शन घेतात, असा आरोपही चेतनने केला आहे. विराट कोहलीला बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर प्रत्युत्तर द्यायचे होते, असेही तो यावेळी म्हणाला. 10 पॉईंट्समध्ये जाणून घ्या चेतन शर्मांनी केलेला मोठा कांड...!
चेतन शर्मा यांनी अनेक खेळाडू हे 80 ते 85 टक्केच फिट असताना इंजक्शन्स घेऊन 100 टक्के फिट होतात. क्रिकेटमध्ये लवकरात लवकर परतण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला. या इंजेक्शनमध्ये एक औषध आहे, जे डोप टेस्टमध्ये पकडले जात नाही.
चेतनने खुलासा केला की काही स्टार खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून ग्रीन सिग्नल मिळतात. त्यानंतर निवडकर्त्याला त्यांच्यावर अंतिम निर्णय घेण्यास सांगितले जाते.
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहचा संघात जबरदस्तीने समावेश करण्यात आल्याचा खुलासा मुख्य निवडकर्त्याने केला. यावरूनच त्याच्या दुखापतीचे गांभीर्य कळू शकते, जर त्याने टी-20 विश्वचषकात एकही सामना खेळला असता तर तो वर्षभरासाठी बाहेर राहिला असता.
हार्दिक पांड्या माझ्या घरी येत जात असतो, तर कर्णधार रोहित शर्मा अर्धा तास बोलतो.
विश्रांतीच्या नावाखाली स्टार खेळाडूंना बाहेर बसवले जात आहे, कारण जेव्हा नवीन नावाला संधी द्यावी लागते तेव्हा मोठ्या खेळाडूला विश्रांती दिली जाते.
विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या वादावर चेतन शर्मा म्हणाले की, सौरभ गांगुली मुळे विराट कोहलीचे कर्णधारपद गेले नाही. 9 लोकांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये गांगुलीने त्याला एकदा विचार करायला सांगितले, पण कदाचित कोहलीने त्याचे ऐकले नाही.
चेतन शर्मा म्हणाले की, कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी कर्णधारपदाचा मुद्दा अनावश्यकपणे उपस्थित केला. दीड तासापूर्वी सांगितल्याचे त्यांनी सांगितले. त्याला गांगुलीवर परतफेड करायची होती.
रोहित शर्मा यापुढे भारतीय T20 संघाचा भाग राहणार नाही आणि पांड्या T20 संघाचे नेतृत्व करेल.
शुभमन गिलला संधी देण्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या स्टार्सना विश्रांती देण्यात आल्याचा आरोप चेतन शर्माने केला आहे.
चेतनने असेही सांगितले की गांगुली रोहितच्या बाजूने नव्हता, उलट तो कोहलीला नापसंत करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.