BCCI Gary Kirsten Coach : भारताने 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकला त्यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन होते. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. ही कामगिरी पाहून बीसीसीआयने पुन्हा एकदा गॅरी कर्स्टन यांच्या गळ्यात प्रशिक्षक पदाची माळ घालण्याचे ठरवले होते. मात्र यात बीसीसीआयला काही यश आले नाही.
बीसीसीआय गॅरी कर्स्टन यांना महिला क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या प्रयत्नाला यश आले नाही. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठी गॅरी कर्स्टन यांच्याशी बोलणी केली होती. मात्र त्याचं पुढं काही झालं नाही.
बीसीसीआय गॅरी कर्स्टन यांना प्रमुख प्रशिक्षक बनवणार होती मात्र ते शक्य झालं नाही. कारण भारताने 2011 चा वर्ल्डकप जिंकला त्यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले गॅरी कर्स्टन यांनी सध्या टी 20 लीगमध्ये दोन संघांसोबत करार केला आहे. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाचे ते मुख्य प्रशिक्षक होऊ शकले नाहीत.
बीसीसीआयच्या एका अटीमुळे हे शक्य होऊ शकले नाही. आता बीसीसीआय दुसऱ्या व्यक्तीच्या शोधात आहे. बीसीसीआयने ज्यावेळी तुम्ही भारतीय संघाचे प्रशिक्षक व्हाल त्यावेळी इतर कोणासोबतही करार करायचा नाही अशी ती अट होती.
बीसीसीआय सध्या महिला क्रिकेट संघासाठीच्या प्रशिक्षकपदासाठी मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुजूमदार, भारताचा माजी खेळाडू ऋषिकेश कानिटकर यांचा विचार करत आहे. कानिटकर सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक आहेत. मात्र बीसीसीआय मोठ्या आंतरराष्ट्रीय नावाच्या शोधात आहे. यामुळे मुख्य प्रशिक्षक निवडीसाठी वेळ होत आहे.
पुढच्यावर्षी बांगलादेशमध्ये होणाऱ्या महिला टी 20 वर्ल्डकप आणि 2025 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपपूर्वी दोन वर्षे मुख्य प्रशिक्षक म्हणून मोठ्या नावाचा विचार करत आहे. बोर्डाला महिला संघाच्या व्यवस्थापनात स्थिरता आणण्याच्या प्रयत्नात आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंग्लंड महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार चार्लेट एडवर्ड्स यांचे नाव देखील यादीत आहे. त्याWPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षक हेखील होत्या. मात्र त्यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.