Belgium Goalkeeper arne espeel died after saving penalty kick in football match  swakal
क्रीडा

Arne Espeel : पेनल्टी किक अडवल्यानंतर गोलरक्षकाचा मैदानावरच मृत्यू

एस्पिल हा विंकेल स्पोर्टस ब संघाचा खेळाडू

सकाळ वृत्तसेवा

ब्रुसेल्स : बेल्जियमधील एका स्थानिक फुटबॉल सामन्यात पेनल्टी किक अडवल्यानंतर लगेचच २५ वर्षीय गोलरक्षक अर्ने एस्पिल या गोलरक्षकाचे निधन झाले. बेल्जियमधील पश्चिम ब्राबंट येथील दुसऱ्या श्रेणीचा सामना सुरू होता. विंकेल स्पोर्टस ब या संघाने वेस्ट्रोझेबेक संघाविरुद्ध २-१ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या अर्धात वेस्ट्रोझेबेक संघाला पेनल्टी किक देण्यात आली.

बेल्जियम मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार गोलरक्षक एस्पिलने पेनल्टी किक यशस्वीपणे अडवली मात्र तो लगेचच मैदानावर पडला. काही तरी अनुचित घडत आहे हे लक्षात येतात लगेचच वैद्यकीय मदत देण्यात आली. कृत्रिम श्वास देण्याचाही प्रयत्न करण्यात आला, परंतु रुग्णालयात नेल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. एस्पिल हा विंकेल स्पोर्टस ब संघाचा खेळाडू होता. हा सामना क्लबच्या मैदानावरच सुरू होता. एस्पीलचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल प्रतिक्षेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT